Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक तालुका शेतकी संघाच्या संस्थापक सभासदांना न्याय देणार – मा.खासदार देविदास पिंगळे

पंचवटी -   नाशिक तालुका शेतकी संघाच्या उभारणीसाठी ज्या सभासदांनी २५  रुपयांचे शेअर्स घेऊन संस्था उभी केली त्यांचं सभासदत्व पुन्हा बहाल करून त्या

सातारा हद्दवाढीत समाविष्ट भागासाठी 48.50 कोटी निधी
छत्तीसगडमध्ये स्फोटात दोन जवानांना वीरमरण
शाश्‍वत विकासाच्या दिशेने

पंचवटी –   नाशिक तालुका शेतकी संघाच्या उभारणीसाठी ज्या सभासदांनी २५  रुपयांचे शेअर्स घेऊन संस्था उभी केली त्यांचं सभासदत्व पुन्हा बहाल करून त्यांना न्याय देणार असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी केले. मखमलाबाद विविध कार्य.सह.संस्थेतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. आज मखमलाबाद विविध कार्य सह संस्थेने नाशिक तालुका शेतकी संघ व नाशिक जिल्हा कांदा बटाटा संघाच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार आयोजित केला होता. पुढे बोलताना माजी खासदार देविदास  पिंगळे यांनी सांगितले की सध्या सहकारी संस्था चालविणे खूप अवघड काम झाले आहे. अशा वेळेला संस्थांनी आपल्या उत्पन्नाचे वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजे. आज नाशिक जिल्हा बँकेला १७०० कोटी रुपयांची मदत मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या असलेल्या ह्या बँकेला अजित दादांकडून तातडीची गरज म्हणून पाचशे कोटी रुपये मंजूर केले आहेत आणि येणाऱ्या तीन महिन्यात पुन्हा पाचशे कोटी रुपये मिळणार आहेत त्यामुळे नाशिक जिल्हा बँक उर्जी तावस्थेत येण्यास मदत होईल. निवडणुकीमध्ये सभासदांना जे जे आश्वासन दिले आहे ते येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सभापती शंकरराव पिंगळे हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मखमलाबाद विविध कार्य सह संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ज्या ज्या वेळेला संस्थेला नाशिक तालुका संघाची व नाशिक जिल्हा कांदा बटाटा संघाची गरज पडेल त्या त्या वेळेला निश्चितच ते मदत करतील अशी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी नाशिक जिल्हा कांदा बटाटा संघाचे नवनिर्वाचित चेअरमन श्री रमेश घुगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत नवनिर्वाचित उपसभापती सविता तुंगार यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिल काकड यांनी प्रास्ताविक संचालक गोकुळ काकड यांनी तर आभार  उपसभापती प्रकाश कडाळे यांनी मानले. कार्यक्रमाला तालुका संघाचे नवनिर्वाचित सभापती दिलीप थेटे व त्यांचे सर्व संचालक मंडळ तसेच कांदा बटाटा संघाचे नवनिर्वाचित सभापती रमेश घुगे व त्यांचे सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे राजाराम धनवटे,उत्तमराव खांडबहाले,संजय तुंगार,तानाजी पिंगळे,मदन शेठ पिंगळे,वाळू पैलवान काकड, संतोष पालवे,शंकरभाऊ फडोळ,दिलीप पिंगळे संजय फडोळ, डॉक्टर तांदळे चंद्रभान पिंगळे,संपतराव पिंगळे,साहेबराव काकड, भास्करराव पिंगळे,आर के पिंगळे,प्रल्हाद काकड,साहेबराव पिंगळे,बाळासाहेब मेहंदळे,वसंतराव पिंगळे,बाळासाहेब पिंगळे,वामन दादा पिंगळे,रामदास दराडे दिपक केदार, साहेबराव पिंगळे रमेश काकड आधी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

COMMENTS