Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीरभद्र दूध संस्थेचे संस्थापक स्व. पुरूषोत्तम लोंढे यांचा जन्मशताब्दी महोत्सव उत्साहात

राहाता ः श्री वीरभद्र दूध व्यावसायिक उत्पादक संस्था, माजी सैनिक भानुदास गाडेकर यांच्या वतीने वीरभद्र दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पुरुष

चारित्र्यावर संशय घेवून पत्नीला मारहाण
राहुरी तालुक्यात दुचाकीस्वारावर बिबट्याचा हल्ला
Shrigonda : श्रीगोंदयातील राजकारणाला वेगळं वळण …कारखाना सभासदांनी केली ही मागणी l LokNews24

राहाता ः श्री वीरभद्र दूध व्यावसायिक उत्पादक संस्था, माजी सैनिक भानुदास गाडेकर यांच्या वतीने वीरभद्र दूध संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय पुरुषोत्तम लोंढे यांची जन्म  शताब्दी महोत्सव  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी वीरभद्र दूध संस्थेचे अध्यक्ष सखाहरी सदाफळ यांच्या हस्ते स्वर्गीय लोंढे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष संपतराव बावके, संचालक अशोक शिंदे, सुधाकर लोहाटे, बाळासाहेब लांडगे, सदाशिव रोहम, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, नामदेव लावरे, भाऊसाहेब मेहत्रे, माधवराव घाडगे, अनिल धाडगे, सर्जेराव मते, नानाभाऊ भुजबळ, विजय मोगले, प्रकाश बेंद्रे, उद्योजक विलास डूगरवाल, राजेशशेठ भन्साळी, राजेंद्र वाबळे, गोटू शेठ रायसोनी, शंकरशेठ बाबर, अनिल सोमवंशी, बाळासाहेब सोनटक्के, विजय अग्रवाल, बाळासाहेब खंदारे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, संस्थेचे सचिव उद्धव देव्हारे, दूध सुपरवायझर बापूसाहेब कुदळे, कर्मचारी संदीप राहणे, दूध उत्पादक शेतकरी संस्थेचे सभासद व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कै. पुरुषोत्तम लोंढे यांचा कार्याचा गौरव करताना अनेक मान्यवरांनी सांगितले की कै.लोंढे यांनी प्रामाणिक तत्त्वावर दूध संस्थेचा कारभार चालविला त्यांच्या चांगल्या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीला कोणालाही दाम नाही व राम राम नाही फक्त त्यांनी संस्था व सभासद दूध उत्पादकांचे हिताचे कार्य केले हे पाहून सभासदांनी त्यांना व त्यांचे सदस्यांना 6 वेळेस निवडून दिले आजचे संचालक मंडळ त्यांच्या कार्याची जाणीव ठेवूनच कार्य करीत आहे. कै. पुरुषोत्तम लोंढे यांनी वीरभद्र डेअरीची स्थापना 1974 सली केली ते संस्थापक,अध्यक्ष म्हणून सलग 20 वर्ष संस्थेचे अध्यक्ष राहिले. त्यांनी आपल्या कालावधीमध्ये दूध उत्पादक व दूध खरेदीदार करणार्‍या ग्राहकांना विशेष रिबेट ची रक्कम दर दिवाळीला दिल्याने राहाता वासियांची दिवाळी विरभद्र दूध संस्थेमुळे आनंदात होत होती. त्यांच्या कालावधीमध्ये संस्थेने नगर मनमाड रोडवर मोठी जागा घेऊन संस्थेचे कार्यालय उभारले, त्यांच्या प्रामाणिक कार्याची आज नागरिक दखल घेत आहे त्यांचा आदर्श राजकीय लोकांनी व संस्थाचालकांनी घेण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. यावेळी नानासाहेब भुजबळ,नामदेवराव लावरे, राजेंद्र वाबळे,विजय मोगले,सर्जेराव मते, मधुसूदन रोहम, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे यांनी केले.

COMMENTS