Homeताज्या बातम्याशहरं

दहशतवाद, घुसखोरांविरोधात लढा सुरूच राहील : गृहमंत्री शहा

नवी दिल्ली : शहीद दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राष्ट्रीय पोलिस स्मारकावर आदरांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले की, हे पोलिस कर्मचारी

अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा संपन्न
Jalgaon : टपरीवाल्याला विचारलं तरी तो सांगेल महाविकास आघाडीला टार्गेट केल जातंय- रोहित पवार
अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे होणार मूल्यमापन

नवी दिल्ली : शहीद दिनानिमित्त गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी राष्ट्रीय पोलिस स्मारकावर आदरांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले की, हे पोलिस कर्मचारी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छपासून किबिथूपर्यंत देशाच्या सीमांचे रक्षण करत आहेत. दहशतवाद, घुसखोरी आणि धार्मिक तणावाविरुद्ध आमचा लढा सुरूच राहील. इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक तपन कुमार डेका यांनीही शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली आणि सांगितले की, गेल्या वर्षी 216 पोलीस शहीद झाले होते. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत 36,468 पोलिस शहीद झाले आहेत. राष्ट्रीय पोलिस स्मारक येथे दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी शहीद दिन साजरा केला जातो. याचे नेतृत्व सहसा केंद्रीय गृहमंत्री करतात. यादरम्यान दिल्ली पोलिसांसह केंद्रीय सशक्त पोलिस दल एकत्र परेड करतात. 21 ऑक्टोबर 1959 रोजी चिनी सैन्याने अवजड शस्त्रांसह लडाखमधील हॉट स्प्रिंग्सवर हल्ला केला. यामध्ये 10 शूर पोलीस शहीद झाले. तेव्हापासून 21 ऑक्टोबरला शहीद दिन साजरा केला जातो. याला पोलीस स्मृतिदिन असेही म्हणतात.

COMMENTS