Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुलीला माहेरी पाठवण्यास नकार देत बापावर कोयत्या,काठ्यांनी हल्ला.

माजलगाव प्रतिनिधी - सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण केली होती म्हणुन त्या महिलेन वडीलांनी माहिती दिल्यावर वडील तीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आल

13 वर्षीय मुलीचा विवाह लावणारे गोत्यात (Video)
संभुआप्पा-बुवाफन यात्रेतील बाजार शाळा नंबर 1 समोरील मैदानावर भरणार : विक्रमभाऊ पाटील यांची माहिती
11 कोटींहून अधिक ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची जोडणी

माजलगाव प्रतिनिधी – सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण केली होती म्हणुन त्या महिलेन वडीलांनी माहिती दिल्यावर वडील तीला माहेरी घेऊन जाण्यासाठी आले असता सासर कडील मंडळींनी मुलीला माहेरी पाठवण्यास नकार देत भांडणाची कुरापत काढुण बापाला शिवीगाळ करत मारहाण करून कोयत्या,काठ्यांनी हल्ला करत गंभीर जखमी करुन फ्रॅक्चर केल्याची घटना घडली. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार प्रकरणातील फिर्यादी सटवाजी सखाराम सरवदे रा.थारवांगी,ता.मानवत,जि.परभणी यांची मुलगी देवळा,ता.माजलगाव येथे दिली आहे त्या मुलीसोबत पती,सासरा,सासु,दिर,जाऊ यांनी भांडण, तंटे करुन मारहाण केली होती. याची माहिती त्या महिलेन वडील सटवाजी सरवदेंना दिली होती म्हणुन ते 30मार्च रोजी देवळा येथे आले व मुलीला माहेरी घेऊन जातो म्हणाले. यावर प्रकरणातील आरोपी नामे योगेश नारायण हिंगे,नारायण सखाराम हिंगे,द्वारकाबाई नारायण हिंगे, सुरेश नारायण हिंगे, मिरास अशोक हिंगे यांनी संगनमत करुन माहेरी पाठवण्यास नकार देत भांडणाची कुरापत काढत सटवाजी सरवदेंना शिविगाळ करत मारहाण केली तसेच कोयत्या,काठ्यांनी हल्ला करत गंभीर  फ्रॅक्चर करुन जिवे मारण्या धमक्या दिल्या. अशी फिर्याद सटवाजी सरवदेंनी 1एप्रिल रोजी दिंद्रुड पोलीस ठाण्यात दिल्याने उपरोक्त उल्लेखित आरोपीं विरोधात भादंवि.कलम 504,323,326,506,34नुसार गुन्हे दाखल करण्यात आले याचा तपास पोउपनि.ननवरे करताहेत.

COMMENTS