मुंबई/प्रतिनिधी ः नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँगे्रसचे नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्ष चव्हाटयावर आला ह

मुंबई/प्रतिनिधी ः नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँगे्रसचे नेते बाळासाहेब थोरात आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यातील संघर्ष चव्हाटयावर आला होता. त्यानंतर त्यांनी मनोमिलन करण्याचा प्रयत्न करत, संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मात्र तरी याप्रकरणी चर्चा होणार असून, याप्रकरणाचा अहवाल 26 फेब्रुवारी रोजी रायपूरच्या राष्ट्रीय अधिवेशनात अहवाल सादर होणार.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भविष्य मंगळवारी (21 फेब्रुवारी) अहवाल बंद झाले आहे. या दोघा नेत्यांच्या पक्षातील वर्तणुकीचा अहवाल 26 फेब्रुवारी रोजी रायपूर येथे होणार्या काँग्रेस अधिवेशनात सादर केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवारीवरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी एकमेकांवर आरोप केले होते. या परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काँग्रेसचे केरळमधील ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला यांना राज्यात पाठवले होते. रविवार ते मंगळवार असे तीन दिवस ते मुंबईत होते. काँग्रेसचे माजी मंत्री, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, आमदार, खासदार यांना ते भेटले. परळच्या टिळक भवनामध्ये सोमवारी त्यांनी अनेकांची मते जाणून घेतली. मंगळवारी त्यांनी नरिमन पॉइंट हॉटेलमध्ये अनेकांच्या भेटी घेतल्या. त्यामध्ये ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना पाचारण केले होते. बाळासाहेब थोरात यांना चेन्नीथला येथेच भेटले. प्रदेशाध्यक्षपदी नवी नावे छत्तीसगडमधील रायपूर येथे 26 फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे अधिवेशन आहे. त्या वेळी चेन्नीथला आपला अहवाल सादर करतील, असे समजते. प्रदेश काँग्रेस अध्यक्षाबाबत चेन्नीथला नवी नावे सुचवू शकतात. नाशिक पदवीधरचा गोंधळ कुणामुळे झाला? त्या संदर्भात ते टिप्पणी करण्याची शक्यता असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महाराष्ट्रातील निवडणुकाविषयीचे पक्षाचे नियोजन चेन्नीथला आपल्या अहवालात मांडण्याची शक्यता आहे.
COMMENTS