Homeताज्या बातम्यासंपादकीय

तेलगे देसमचे भवितव्य ?

तेलगु देसम या पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना अटक केल्यानंतर आंध्रप्रदेशचे राजकीय वातावरण ढवळून निघतांना दिसून येत आहे. मात्र यानिमित्ताने

कौल कुणाला ?
जगणे महागले
नव्या अध्यक्षांना अधिकार मिळतील का ?

तेलगु देसम या पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना अटक केल्यानंतर आंध्रप्रदेशचे राजकीय वातावरण ढवळून निघतांना दिसून येत आहे. मात्र यानिमित्ताने तेलगु देसमचे आगामी भवितव्य काय असा सवाल देखील उपस्थित करण्यात येत आहे. खरंतर  चंद्राबाबू नायडू महत्वाकांक्षी व्यक्तीमत्व. आपलेच सासरे असलेल्या एन.टी. रामाराव यांना बाजूला करून त्यांनी पक्ष आणि सत्ता 28 वर्षांपूर्वी आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून चंद्राबाबू नायडू आंध्रच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात तळपत राहिले. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून चंद्राबाबू नायडू यांना आणि त्यांच्या पक्षाला आहोटी लागली असून, अनेक महत्वाचे शिलेदार पक्ष सोडून जातांना दिसून येत आहे. त्यातच त्यांना अटक झाल्यामुळे त्यांची ही अटक कायदेशीर आहे की, राजकारणाचा एक भाग आहे, यावरही महत्वाचा खल सध्या सुरू आहे.
खरंतर आंध्रच्या राजकारणात चंद्राबाबू नायडू यांना सत्तेत परतण्याची संधी होती, मात्र त्यांनी भाजपशी काडीमोड करून आपल्याच पायावर दगड पाडून घेतला. याउलट विद्यमान मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी आपले धोरण भाजपशी अनुकूल करून घेतल्यामुळे ते भाजपच्या अधिक जवळ जातांना दिसून येत आहे. शिवाय जगनमोहन रेड्डी यांची स्वच्छ प्रतिमा, विकासाचा वेग, यामुळे त्यांचा मोठा प्रभाव वाढतांना दिसून येत आहे. त्याचवेळी 2018 मध्ये चंद्राबाबू यांनी भाजप केंद्रामध्ये सत्तेवर असतांना, त्यांची साथ सोडून आपल्याच पायावर दगड पाडून घेतला आहे, त्यामुळे चंद्राबाबू यांची आगामी वाटचाल अवघड असल्याचे दिसून येत आहे. चंद्राबाबू नायडू 2014-19 या काळात मुख्यमंत्री असताना आंध्र प्रदेश कौशल्य विकास महामंडळामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने केला असून या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी नायडू यांना अटक करण्यात आली. विजयवाडा मधील लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाने नायडू यांना 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. न्यायलयाच्या निकालानंतर विजयवाडा पासून 200 किमी अंतरावर असलेल्या राजमुंद्री केंद्रीय कारागृहात नायडू यांची रवानगी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही अटक आंध्रच्या विधानसभा आणि देशभरात होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही अटक करण्यात आल्यामुळे आगामी काही महिने चंद्राबाबू यांना तुरुंगात काढावे लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर राज्यभरातून टीडीपीच्या प्रदेश आणि जिल्हा पातळीवर नेत्यांना गृहकैदेत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तेलगू देसम पक्षाला राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात यश आलेले नाही. तेलगू देसम पक्षाच्या सर्व 21 आमदारांना पोलिसांच्या निगराणीत गृहकैद करण्यात आलेली आहे. त्यामुळे चंद्राबाबूंना बर्‍याच दिवसांसाठी तुरुंगात काढावे लागतील, असेच दिसून येत आहे. कारण चंद्राबाबू गेल्या काही वर्षांपासून भावनिक राजकारण करतांना दिसून येत आहे. कारण 2021 मध्ये त्यांनी चालू कार्यकाळात आपण विधानसभेत पाय ठेवणार नाही, अशी चंद्राबाबू नायडू यांनी शपथ घेतली. सत्तेवर असणार्‍या वायएसआर काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी माझा आणि माझ्या पत्नीचा अपमान केल्याच्या निषेधार्थ त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी ते भावूक झाल्याचा व्हिडिओ समोर आला होता. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे सत्ताधारी पक्षाते सदस्य जेव्हा माझ्या पत्नीसंदर्भात अपशब्द बोलत होते, तेव्हा अध्यक्ष केवळ बघत राहिले. राहिलेल्या वेळात विधानसभेपासून दूर राहण्याचा माझा निर्णय बोलू दिला नाही. मागील अडीच वर्षांपासून मी हा अपमान सहन करत असल्याचा आरोप त्यांनी सत्ताधार्‍यांवर केला होता.  त्यानंतर अलीकडच्या काही दिवसांमध्ये माझी ही शेवटची निवडणूक असून, माझ्या पक्षाला सत्तेवर असे आवाहन त्यांनी मतदारांना केले होते. त्यामुळे भावनिक राजकारणामुळे तेलगु देसमचा जनाधार वाढू शकतो, कदाचित याच भीतीपोटी त्यांना अटकही करण्यात आली असावी. मात्र यानिमित्ताने, तेलगु देसमचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगे्रसनंतर पुन्हा एकदा तेलगु देसम पक्ष संपतांना दिसून येत आहे. त्यामुळे चंद्रबाबू संघर्षाचा पवित्रा घेतात की, पुन्हा एकदा जुळवून घेतात, यावरच पुढील गणिते ठरणार आहेत.

COMMENTS