शिवसेनेचे भवितव्य 12 डिसेंबरला ठरणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेचे भवितव्य 12 डिसेंबरला ठरणार

निवडणूक आयोगासमोर होणार सुनावणी

नवी दिल्ली प्रतिनिधी - राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात लांबणीवर पडली असली तरी, शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण कुणाचे, यावर लव

दिल्ली महापालिकेवर ‘आप’चा झेंडा
कु. गुंजन अग्रवालचा सत्कार
विशेष अधिवेशनात आवाज उठवा सकल मराठा समाजाचा आक्रोश  

नवी दिल्ली प्रतिनिधी – राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात लांबणीवर पडली असली तरी, शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण कुणाचे, यावर लवकरच निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगासमोर येत्या 12 डिसेंबर रोजी ही सुनावणी होईल, अशी माहिती समोर आली आहे.
ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांचे वकील निवडणूक आयोगासमोर या दिवशी युक्तिवाद करतील. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवले होते. तसेच दोन्ही गटांना वेगळी नावे देण्यात आली होती. आता येत्या 12 डिसेंबरला शिवसेनेवर कुणाचा दावा प्रबळ ठरतोय, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना पक्षावर दावा सांगण्याकरिता पुरावे म्हणून सर्व कागदपत्रे सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. 23 नोव्हेंबरला ही मुदत संपली. दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे महत्त्वाचे पुरावे सादरही करण्यात आले आहेत. शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यानंतर आमदार अपात्रतेचा आणि शिवसेना पक्षाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला. मात्र कोर्टाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान, अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्ह गोठवले. त्यानंतर दोन्ही पक्षांना नावे आणि चिन्ह देण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आले. या दोन्ही गटांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची छानणी आता केली जाईल. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी पहिली सुनावणी केली जाईल. या सुनावणीवेळीही अंतिम निकाल लागण्याची शक्यता कमीच आहे. दरम्यान, काही महापालिका निवडणुकांपूर्वीही शिवसेना पक्षचिन्हाचा वाद सुटला नाही तर दोन्ही गटातील नेत्यांना ढाल तलवार आणि मशाल चिन्हावरच निवडणूक लढवावी लागेल, अशी शक्यता आहे.

COMMENTS