निवडणुकांचे भवितव्य टांगणीला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निवडणुकांचे भवितव्य टांगणीला

राज्यात सत्तासंघर्षांवर लवकर निकाल न आल्यामुळे जसा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे, तसाच निवडणुकांचा आणि राजकीय पेच देखील निर्माण झाला आहे. राज्यात सध्

वाढते दहशतवादी हल्ले चिंताजनक
विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक !
डिजिटल अरेस्टच्या घटना चिंताजनक !

राज्यात सत्तासंघर्षांवर लवकर निकाल न आल्यामुळे जसा घटनात्मक पेच निर्माण झाला आहे, तसाच निवडणुकांचा आणि राजकीय पेच देखील निर्माण झाला आहे. राज्यात सध्या अनेक पेच निर्माण झाले आहे. ते सोडविणे गरजेचे आहे, अन्यथा राज्य अस्थिर होण्यास वेळ लागणार नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा झालेला पेच, त्यानंतर महापालिकांची निवडणूक, यामध्ये शिवसेना धनुष्यबाण या चिन्हांवर निवडणूक लढणार का, शिंदे गट कोणत्या चिन्हांवर निवडणूक लढणार, या सर्वं प्रश्‍नांचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीतून मिळणे अपेक्षित आहे. मात्र न्यायालयातील सुनावणीला विलंब होत असल्यामुळे या प्रश्‍नांचा गुंता वाढतांना दिसून येत आहे.
राज्यातील निवडणुका बघता, त्यांना 6 महिन्यापेक्षा जास्तकाळ त्यांच्यावर प्रशासक नेमता येत नाही. मात्र दिवाळीनंतर निवडणुकांची कोंडी फुटण्याची शक्यता असून, साधरणतः दिवाळीनंतर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये महापालिका निवडणुका होतील. त्यादृष्टीने सर्वच पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरूवात केली असली तरी भाजपने मात्र यात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. तर शिवसेना अजूनही पक्षचिन्हाच्या संभ्रमात आहे. त्यांनी पुढील तयारी सुरु ठेवली असली, तरी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेनेची रणनीती ठरणार आहे. तोपर्यंत शिवसेनेला गॅसवर राहावे लागणार आहे. मात्र सत्तासंघर्षांच्या या पेचामुळे राजकीय संभ्रम मोठया प्रमणावर वाढतांना दिसून येत आहे. नगरपालिकांच्या निवडणुुका आरक्षणासह घ्यायच्या की नाही, यावर अनेकदा संभ्रम निर्माण झाला. शिवाय ओबीसी आरक्षणात बाठिंया आयोगाच्या अहवालात सर्वोच्च न्यायालयाने त्रुटी काढल्यामुळे ओबीसी आरक्षण टांगतीवर असतांनाच, प्रभागाची संख्या यावर देखील गंडातंर आले आहे. त्यामुळे यासंदर्भातील सर्वच पेच सर्वोच्च न्यायालायील निर्णयानंतर सुटतील. मात्र न्यायालय देखील त्वरित निकाल देतील, असेतरी सध्या दिसून येत नाही. त्यामुळे निवडणुकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार अजूनही टांगणीला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार स्थिर झाल्यानंतर विद्यमान सरकारला अनेक निर्णय घ्यायचे आहेत, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाअभावी अनेक प्रक्रिया सध्या रखडल्या आहेत. आगामी काही दिवसांमध्ये नगरपालिका आणि महापालिकेच्या निवडणुका होतील. भाजपने तर निवडणुकीचे रणशिंग फुंकले देखील आहे. मात्र या निवडणुकीत भाजपने आघाडी घेतली आहे. मात्र या निवडणुकीत सर्वांत मोठा पेच शिवसेना आणि शिंदे गटासमोर आहे. शिंदे गट शिवसेनेतून बाहेर पडल्यामुळे शिवसेना नेमकी कुणाची हा पेच सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाच्या दारी आहे. त्यामुळे याचा जोपर्यंत निवाडा होत नाही, तोपर्यंत शिवसेना आणि शिंदे गट संभ्रमातच राहण्याची जास्त शक्यता आहे. मात्र यामध्ये निवडणुकांच्या आधीच प्रचारात भाजप आघाडी घेतांना दिसून येत आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे फारसे प्राबल्य नसल्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रस शांत आहे. तर दुसरीकडे काँगे्रसचे मुंबईमध्ये थोडयाफार प्रमाणावर अस्तित्व असले, तरी ते एकटे लढूनही त्यांना फारसे काही यश मिळणार नाही. शिवाय काँगे्रसमधील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्यामुळे काँगे्रसने अजूनही या महापालिका निवडणुकींच्या दिशेने कोणतीही रणनीती ठरवल्याचे एकंदरित दिसून येत नाही. काँगे्रसने भारत जोडो, यात्रा काढत काँगे्रसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करण्यात येत असला तरी, याची प्रसिद्धी मोठया प्रमाणावर होतांना दिसून येत नाही. तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथुन भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला असला तरी, तेथे अशी कोणतीच अशी प्रभावी प्रचारयंत्रणा नव्हती. त्यामुळे काँगे्रस इतका मोठा इव्हेंट, करत असतांना,त्याला आपल्यावर प्रसिद्धीचा झोत ठेवता येत नसेल, तर ते काँगे्रसचे अपयशच म्हणावे लागेल. 

COMMENTS