Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणी सोडत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही

आंदोलनकर्ते अ‍ॅड. योगेश खालकर यांचा इशारा

कोपरगाव ः उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षण ग्रस्त 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे धरण प्रकल्पाच्या कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील दुष्काळी

सोमनाथ जंगम यांचा डॉक्टर ऑफ सोशल वर्क किताबाने सन्मान
सुरेगाव ग्रामपंचायत साजरा करणार 65 वा वर्धापन दिन
विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याच्या विविध संधी उपलब्ध आहे : योगेश गलांडे

कोपरगाव ः उत्तर नगर जिल्ह्यातील अवर्षण ग्रस्त 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे धरण प्रकल्पाच्या कालव्याद्वारे लाभक्षेत्रातील दुष्काळी गावांतील पाझर तलावात प्रस्तावित चार्‍याद्वारे पाणी सोडले जात नाही तो पर्यंत आपले ’आमरण उपोषण’ सोडले जाणार नाही असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्ते अ‍ॅड.योगेश खालकर यांनी आज रांजणगाव देशमुख येथील एका कार्यक्रमात बोलताना दिला आहे.

निळवंडे डाव्या कालव्याची दुसरी चाचणी बंद करण्याआधी लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव, के. टी. वेअर प्रस्तावित चार्‍यांच्या माध्यमातून भरून देऊन दुष्काळी पट्टयातील शेतकर्‍यांचे पशुधन वाचवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जलसंपदा विभागाने प्राधान्याने करावी अशी महत्वपूर्ण मागणी घेऊन रांजणगाव देशमुख या ठिकाणी आज सकाळी 10 वाजता ऍड.योगेश खालकर, डॉ.अरुण गव्हाणे, माजी सरपंच कैलास रहाणे, गजानन मते, मनेगाव ग्रामपंचायत सरपंच अण्णासाहेब गांगवे, संजय बर्डे आदी कार्यकर्त्यांनी ’आमरण उपोषण’ गत दोन दिवसांपासून सुरू ठेवले असून या आंदोलनाला पाठींबा व्यक्त करण्यासाठी परिसरातील शेतकर्‍यांनी तळेगाव मार्गे कोपरगाव-संगमनेर मार्गावर ’रास्ता रोको आंदोलन’ आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. सदर प्रसंगी निळवंडे कालवा कृती समितीचे मार्गदर्शक नानासाहेब जवरे, कार्याध्यक्ष गंगाधर रहाणे,सचिव कैलास गव्हाणे, सिकंदर इमानदार, कौसर सय्यद, भिवराज शिंदे, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश गोर्डे, रवींद्र वर्पे, संतोष वर्पे, सुखलाल गांगवे, धनजन वर्पे, शिंदे, रावसाहेब मासाळ, प्रा.सीताराम कोल्हे, सुखदेव खालकर रामनाथ पाडेकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. सदर प्रसंगी आंदोलनस्थळी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले, पोलिस निरीक्षक सोपान शिरसाठ अभियंता गायकवाड, साबळे आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्ते अ‍ॅड.योगेश खालकर यांना आश्‍वासित केले आहे. मात्र जो पर्यंत डांगेवाडी (काकडी) वेस-सोयगाव, बहदराबाद आदी पाझर तलावात पाणी प्रथम सोडले जात नाही पुंछ भाग ते शिर्षस्थळा पर्यंत पाणी जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडले जाणार नाही असे बजावले आहे.

COMMENTS