अहमदनगर/प्रतिनिधी : शेतातील उभ्या उसाला तोड मिळत नसल्याने व वाढत्या उन्हामुळे ऊस वाळून जाऊ लागल्याने अस्वस्थ झालेल्या शेतकर्याने आधी उसाला आग लावली
अहमदनगर/प्रतिनिधी : शेतातील उभ्या उसाला तोड मिळत नसल्याने व वाढत्या उन्हामुळे ऊस वाळून जाऊ लागल्याने अस्वस्थ झालेल्या शेतकर्याने आधी उसाला आग लावली व नंतर स्वतः विषारी औषध घेऊन जीवन संपवले. शेवगाव तालुक्यातील जोहरापूर येथे ही बुधवारी ही घटना घडली. ऊसतोड अभावी शेतकर्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दवी घटना घडल्याने जोहरापूर परिसरात खळबळ उडाली आहे. ऊसतोड मिळत नसल्याने अगोदर उसाला आग लावली व नंतर या शेतकर्याने औषध घेतले. या घटनेने परिसरात अस्वस्थता व्यक्त होत असून, अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शेतकर्यांमध्ये साखर कारखान्यांच्या विरोधात संताप निर्माण झाला.
शेवगाव तालुक्यातील जोहरापुर येथील जनार्धन सिताराम माने (वय 70) या वृद्ध शेतकर्याने कारखान्यावर चकरा मारूनही आपल्या उसाला तोड मिळत नसल्याने मंगळवार दि.5 रोजी दुपारी 2 वाजता स्वतःच्या हाताने उसाला आग लावली व नैराशातून उसाच्या फडात विषारी औषध घेतले. त्यांना उपचारार्थ शहरातील नित्यसेवा रुग्णालयात दाखल केले असता बुधवार दि.6 रोजी दुपारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या घटनेने साखर कारखाना विरोधात शेतकर्यात संतापाची लाट उसळली असून शेतकर्यांना ऊसतोडीसाठी त्रास देणार्या साखर कारखान्याबाबत चीड निर्माण झाली आहे.
मृत जनार्धन माने हे खामगाव शिवारात गट नं.9 मध्ये उभा असणार्या आपल्या पावणे तीन एकर उसाला तोड मिळावी यासाठी महिन्यापासुन कार्यक्षेत्रातील कारखान्याकडे चकरा मारीत होते पंरतु त्यांना फक्त पुढची तारीख दिली जात होती. गयावया करुनही ऊसतोड लांबत चालल्याने गाळपाअभावी ऊस उभाच राहतो कि काय या नैराशाने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा जबाब मृत शेतकरी यांचा मुलगा संतोष जनार्धन माने यांनी पोलिसांना दिल्याची माहिती आहे. शेवगाव तालुका कार्यक्षेत्रात चार ऊस कारखाने असुनही कार्यक्षेत्रातील शेतकर्यास ऊसतोड अभावी आत्महत्या करावी लागली ही मोठी शोकांतिक झाली असुन यामुळे अतिरिक्त ऊसाचा प्रश्ण आता ऐरणीवर येत आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी हा पुरग्रस्त होता ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने पुरपरिस्थिती निर्माण झाली होती व पुराच्या पाण्याने या मृत शेतकर्याच्या उसाला वेढा दिला होता. हा ऊस गाळपास आज जाईल उद्या जाईल या आशेवर तो शेतकरी होता मात्र उसाला तोड येत नसल्याने तो हताश झाला व त्यांनी आत्महत्या केली, अशी चर्चा असुन या बाबत पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.
COMMENTS