Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारिकरणाला येणार गती

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळ विस्तारिकरणासाठी आवश्यक असलेल्या 62 एकर जमिनीत असलेली घरे, कारखाने याची पाहणी आज महाराष्ट्र विमान विकास

बुलढाणा जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन पद्धतीला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद
वन विभागाच्या कर्मचार्‍यांकडून तरास नैसर्गिक अधिवासात
पवनक्क्यांचे साहित्य चोरणारे नऊजणांना अटक

कोल्हापूर / प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळ विस्तारिकरणासाठी आवश्यक असलेल्या 62 एकर जमिनीत असलेली घरे, कारखाने याची पाहणी आज महाराष्ट्र विमान विकास कंपनीचे (भूसंपादन) अपर जिल्हाधिकारी दीपक नलवडे यांनी केली. ही जमीन संपादित करण्यापूर्वी मोजणी खात्याने या जागेत असलेल्या घरे व कारखान्यांची माहिती दिली होती. या माहितीची सत्यता आजच्या पाहणीत पडताळली.
पाहणीवेळी पालकमंत्री सतेज पाटील हेही मुंबईहून विमानतळावर दाखल झाले. त्यांनी नलवडे यांच्यासह करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर, विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया यांची बैठक घेतली. विमानतळ विस्तारिकरण व सुविधांबाबत रविवार, दि. 24 शासकीय विश्रामगृहावर बैठक घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
विमानतळ विस्तारिकरणासाठी गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील 62 एकर जमीन संपादित करावी लागणार आहे. याबाबत कंपनीने मोजणी खात्यांकडून अहवाल मागवला होता. अहवालात या जमिनीत काही घरे, कारखाने असल्याची माहिती मोजणी खात्याने दिली होती. या जमीन संपादनासाठी कंपनी पैसे देणार आहे तर कंपनीला महाराष्ट्र शासनाकडून पैसे दिले जाणार आहेत. एकदा जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर नागरिकांकडून या जमिनीत आमचे मोठे घर होते, कारखाना होता अशा स्वरूपाच्या तक्रारी होतात. या तक्रारीच्या अनुषंगाने व मोजणी खात्याने पाठवलेली माहिती खरी आहे का नाही याची पाहणी आज कंपनीचे अपर जिल्हाधिकारी नलवडे यांनी केली. या वेळी त्यांच्यासोबत करवीर प्रांताधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.
पुढच्या टप्प्यात या संपूर्ण जमिनीचे व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. त्यानंतर एक नोटीस प्रसिध्द करून ठराविक तारखेपर्यंत या जागेत असलेल्या बांधकामांनाच भरपाई दिली जाईल, अशी सूचना देण्यात येईल. त्यानंतर भरपाई व संपादनाचे काम सुरू होणार आहे. ही प्रक्रिया तातडीने करण्याचे नियोजन असून त्यामुळे विमानतळ विस्तारिकरणाला गती येणार आहे.

COMMENTS