Homeताज्या बातम्यासंपादकीय

शपथविधीसह आघाडी सरकारांचा काळ सुरू !

काल संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील सहा खासदारांना दिल्लीहून फोन आले. आलेल्या फोनचा अर्थ असाच होता की, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल. सहा जणांप

नव्या लोकसभेच्या दिशेने….!
न्यू वर्ल्ड ऑर्डर म्हणजे काय ? 
पक्षांच्या समर्थन-विरोधात जनता नाही ! 

काल संध्याकाळपर्यंत महाराष्ट्रातील सहा खासदारांना दिल्लीहून फोन आले. आलेल्या फोनचा अर्थ असाच होता की, त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल. सहा जणांपैकी चार जण हे भाजपचे आहेत. यापूर्वीच्या मंत्रिमंडळात राहिलेले पियुष गोयल आणि नितीन गडकरी यांचा समावेश आहे. भाजपमधून ज्यांना बाहेर केले गेले होते, त्या एकनाथ खडसे यांच्या सुनबाई असलेल्या रक्षा खडसे यांनाही बोलावण्यात आलं. या चौघांच्या नावानंतर चौथं नाव मुरलीधर मोहोळ यांचं, पुण्यातून निवडण्यात आलं. त्यांनाही  काल दुपारी फोन करण्यात आला. दुसरी दोन नाव ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि गेल्या मंत्रिमंडळातही आपल्या काव्य बहाराने मंत्रिमंडळात आणि सभागृहात हशा पिकवणारे रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले यांनाही पुन्हा एकदा बोलावणं झालं. मंत्रिमंडळाचा शपथविधी होताना सर्वच गटातटांना सामावून घेण्यात आले असले तरी, शपथविधी सोहळ्यानंतर सभागृहात बहुमताचा ठराव मंजूर झाल्यावर वर्तमान मंत्रिमंडळात रस्सीखेच सुरू होईल; अशा प्रकारची एक सुप्त चर्चा देशभरात आहे. अर्थात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा झालेला शपथविधी हा पंडित नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान होते; त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पहिला शपथविधी आहे. त्यांच्या या कारकिर्दीत त्यांच्या पक्षाला बहुमत नसलं तरी एनडीए आघाडी म्हणून त्यांना बहुमत आहे. परंतु, गेल्या दहा वर्षाचा मोदी यांचा कालखंड एनडीए आघाडीतील पक्षांनाही जुमानणारा नव्हता. कारण, मोदी यांचे नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला २७२ पेक्षा अधिक संख्येने खासदार मिळाल्यामुळे, त्यांचा पक्ष पूर्ण बहुमतात होता. त्यांनी कोणाच्याही म्हणण्याला किंवा कोणाच्याही मताला किंमत दिली नाही.

पहिल्या त्यांच्या कारकिर्दीत २०१४ मध्ये त्यांच्याकडे म्हणजे भाजपाकडे २८२ खासदारांचं बळ होतं; तर, ते २०१९ मध्ये वाढून ३०३ पर्यंत गेले होते. यावेळी तर त्यांनी ४०० पारचाच नारा दिलेला होता. परंतु, प्रत्यक्षात त्यांना बहुमतापेक्षाही लांब राहावं लागलं. त्यामुळे एनडीए आघाडीतील घटक पक्षांवर आता त्यांना अवलंबून राहावं लागत आहे.  मोदी सत्तेवर आल्यानंतर ते अल्पमतात राहणार नाही, ते आपल्याच एनडीए घटकातील पक्षांना तोडून आपल्याकडे बहुमत वाढवण्याची शक्यता आहे, असं बोललं जात आहे! त्यामुळे मोदींचा तिसरा कार्यकाळ नेमका किती काळ आता चालेल, हा खरा यापुढे महत्त्वाचा प्रश्न आहे. या निवडणुकीमध्ये किंगमेकर म्हणून नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांना अतिशय महत्त्व आलेले आहे. अशा वळी इंडिया आघाडीने देखील सत्ता स्थापनेच्या घडामोडी आतून सुरू ठेवलेल्या आहेत. असं एकंदरीत पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांनी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांचे नाव घेऊन इंडिया आघाडी अजूनही सत्ता बनवण्याच्या स्पर्धेत असल्याचे संकेत दिले आहे. अर्थात, काल संध्याकाळी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यामुळे बहुमताच्या ठरावाला आता सामोरे जावे लागेल. त्यानंतर खरे तर सरकार मधली रस्सीखेच सुरू होईल, असा संकेत किंवा अंदाज जवळपास सर्वच राजकीय पक्ष  व्यक्त करत आहेत. मोदी यांचा गेल्या दहा वर्षाचा सत्ता काळ संवैधानिक संस्थांवर ज्या पद्धतीने केवळ अंकुश ठेवणाराच नव्हे, तर थेट आपल्या हातात घेणारा राहिला. तसा आगामी काळ त्यांचा राहील का आणि तसा जर तो त्यांना फ्रीहँड मिळाला नाही, तर ते निश्चितपणे आपल्याच इंडिया घटकातील पक्षांना मोडतोड ची भूमिका घेऊ शकतात; असा अंदाज अनेक राजकीय तज्ञ आणि विश्लेषक व्यक्त करताना दिसत आहे.  मंडल नंतरची तीस वर्षे आघाडीच्या सरकारंची सत्ता राहिली. मोदींचा हा दहा वर्षाचा सत्ता काळ बहुमताचा राहिला. २०२४ च्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय राजकारण आणि सत्ता कारण, हे आघाडीच्या माध्यमातून पुढे जाताना दिसण्याचे संकेत स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे आगामी काळ हा अनेक पक्षांच्या आघाड्यांचा राजकीय सत्तेचा काळ राहील, यात मात्र कोणतीही शंका नाही.

COMMENTS