Homeताज्या बातम्यादेश

संतापलेल्या नागरिकांनी केली रस्त्याची चोरी

बिहार प्रतिनिधी - आजपर्यंत तुम्ही लुटीच्या अनेक घटना पाहिल्या असतील. नुकतेच रस्त्यावर अपघात झालेल्या कारमधील दारुच्या बाटल्या लुटणाऱ्या लोकां

Nagpur : पिकअप व्हॅन झाडावर आदळून भीषण अपघात | LOKNews24
पावसाअभावी शेतकरी हतबल
देयके प्रमाणक नमुन्यासह देयकांवर नगराध्यक्षांच्या बेकायदेशीररीत्या स्वाक्षरी; विरोधी पक्षनेत्या दीपाली शेळके यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार

बिहार प्रतिनिधी – आजपर्यंत तुम्ही लुटीच्या अनेक घटना पाहिल्या असतील. नुकतेच रस्त्यावर अपघात झालेल्या कारमधील दारुच्या बाटल्या लुटणाऱ्या लोकांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सध्या बिहारमध्ये अशीच एक विचित्र लुटीच्या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसू शकतो. कारण या व्हिडीओतील लोक चक्क मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्ग सुरु असलेल्या रस्त्याच्या कामचे सिमेंट काँक्रिट पळवून नेत असल्याचे दिसत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास ३ महिन्यांपूर्वी ३ किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. परंतु तो अद्याप पूर्ण झालेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्याचे काम पूर्ण न होण्याचे कारण कंत्राटदाराचा निष्काळजीपणा नव्हे तर येथील ग्रामस्थ आहेत जे रस्त्याच्या सामानाची लूट करत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये नवीन सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. रस्ता तयार करण्यासाठी सिमेंट, खडी आणि वाळू मिसळून तयार केलेले काँक्रीटचे मिश्रण कामगार रस्त्यावर टाकताच, काही लोक ते सिमेंट काँक्रिट चक्क घमेली आणि बकेटमध्ये भरुन नेत असल्याचं दिसत आहे. गावकऱ्यांसाठी बांधण्यात येत असलेल्या रस्त्याचे काँक्रिट तेथील गावकरीच लुटून नेत असल्याचं पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तर काहीजण यावर मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी बिहारमधील परिस्थितीवरुन मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही टीका करायला सुरुवात केली आहे.

COMMENTS