Homeताज्या बातम्यादेश

धावत्या रेल्वेपासून इंजिन झाले वेगळे

अमृतसर : पंजाब राज्यातील लुधियानामधील खन्ना स्थानका दरम्यान अर्चना एक्स्प्रेसचे इंजिन बोगीपासून वेगळे झाले. हे इंजित सुमारे 3 किलोमीटर धावत राहिल

निळवंडेतून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी
स्वनिर्मित पाऊलवाट नशीब बदलवते ःसुप्रिया कर्णिक
आढळा खोरे बारमाहीसाठी देवठाणमध्ये सहविचार सभा उत्साहात  

अमृतसर : पंजाब राज्यातील लुधियानामधील खन्ना स्थानका दरम्यान अर्चना एक्स्प्रेसचे इंजिन बोगीपासून वेगळे झाले. हे इंजित सुमारे 3 किलोमीटर धावत राहिले. ट्रॅकवर काम करणार्‍या कर्मकार्‍यांनी अलार्म वाजवत याची माहिती ड्रायव्हरला दिल्यावर हे इंजिन थांबले. ट्रॅकवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी अलार्म वाजवत याची  माहिती ड्रायव्हरला दिली. यानंतर चालकाने इंजिन थांबवत बोगी जेथे थांबल्या त्या ठिकाणी  इंजिन नेऊन बोगींना जोडले. सुदैवाने या वेळेत या ट्रॅकवरुन दुसरी रेल्वे आली नाही. अन्यथा मोठा अपघात झाला असता. या ट्रेनमध्ये दोन ते अडीच हजार प्रवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 12355/56 अर्चना एक्स्प्रेस पटनाहून जम्मूला जात होती. सरहिंद जंक्शन येथे या ट्रेनचे इंजिन बदलण्यात आले. यानंतर खन्ना येथे या एक्सप्रेसचे इंजिन बोगी पासून वेगळे झाले. हे इंजिन सुमारे 3 किलोमीटर बोगींशिवाय धावत राहिले. ही घटना रविवारी सकाळी 9.20 वाजता घडली. ट्रॅकवर काम करत असलेल्या कर्मचार्‍यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी मोठा अलार्म वाजवून चालकाला याची माहिती दिली.

COMMENTS