नंदुरबार प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यातल्या 123 ग्रामपंयाचीचे निकाल जाहीर झाले असुन सर्वाधीक जागा मिळवत कॉग्रेस अग्रस्थानी असली तरी तिला या निव
नंदुरबार प्रतिनिधी – नंदुरबार जिल्ह्यातल्या 123 ग्रामपंयाचीचे निकाल जाहीर झाले असुन सर्वाधीक जागा मिळवत कॉग्रेस अग्रस्थानी असली तरी तिला या निवडणुकामध्ये जोरदार फटका बसला आहे. नंदुरबार तालुक्यात कॉग्रेसला खाते सुद्धा उघडता आले नाही. तर दुसरीकडे शिंदे गटाणे 32 ग्रामपंचायतींवर विजय संपादीत करत जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात भाजपाचे पालकमंत्री खासदार आमदार असतांना देखील त्यांना हव तसे यश संपादीत करता आले नाही. भाजपा 32 जागांवर विजयी झाली असली तरी नंदुरबार तालुक्यासह, धडगाव आणि अक्कलकुवा आणि नवापुर या ठिकाणी त्यांना फटका बसला आहे. अक्कलकुवा तालुक्यात शिवसेना उद्धव गटाने बाजी मारली असुन जिल्ह्याभरात उद्धव गटाच्या 13 ग्रामपंचायती निवडुन आल्या आहेत. तर 10 ग्रामपंयाचतींनी तटस्थची भुमिका ठेवली आहे. राष्ट्रवादी देखील तीनच ग्रामपंचायतींमध्ये विजयी झाली आहे.
COMMENTS