औंध / वार्ताहर : औंध येथील श्री यमाई मंगल कार्यालयात वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आज उत्साही वातावरणात

औंध / वार्ताहर : औंध येथील श्री यमाई मंगल कार्यालयात वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी आज उत्साही वातावरणात सुरवात झाली. गादी आणि माती गटात होणार्या स्पर्धेसाठी 210 मल्लांनी सहभाग नोंदविला आहे.
सातारा जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अंकुश भाऊ गोरे युवा मंचने निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. वरिष्ठ अंजिंक्यपद महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी आणि ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड चाचणी होणार आहे. महिला महाराष्ट्र केसरी साठी 10 वजनी गटातून 26 महिला कुस्तीगीरांनी सहभाग नोंदवला आहे. ग्रिकोरोमन महाराष्ट्र केसरीसाठी वजनगटातून 56 मल्ल सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र केसरी गादी गट 50 आणि माती गटात 78 मल्ल सहभागी झाले आहेत. सकाळच्या सत्रात तांत्रिक समिती प्रमुख प्रा. अमोल साठे यांनी पंचांना मार्गदर्शन केले. स्पर्धेत सहभागी मल्लांची वजने घेण्यात आली. त्यानंतर लॉट टाकण्यात आले. दुपारच्या सत्रात प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवात मॅटचे पूजन करण्यात आले. यावेळी युवा उद्योजक अंकुशभाऊ गोरे, जिल्हा परिषद गटाच्या नेत्या भारतीताई गोरे, कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, सचिव धनाजी पाटील, हिंद केसरी संतोष वेताळ, हिंद केसरी विकास जाधव, दादासाहेब इंगळे, शशिकांत मोरे, उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडघम, बापूराव चव्हाण, शशिकांत जाधव, बापूसाहेब माने, साक्षी बनसोडे, निलेश लोखंडे, जालिंदर राऊत, सुरेश थोरात, अधिक जाधव, शिवाजी जाधव, विकास गुंडगे, किसन आमले, संतोष भोसले, सनी इंगळे, आप्पा राजगे, शिवाजी राजगे उपस्थित होते. आयोजक अंकुश गोरे यांनी स्पर्धेचे नेटके नियोजन केले आहे. निवड चाचणीसाठी दोन मॅट (गादी) आखाडे आणि एक मातीचा आखाडा तयार करण्यात आला आहे. कुस्ती शौकीनांना बसण्यासाठी स्वतंत्र गॅलरीची सोय करण्यात आली आहे. कुस्तीचा थरार पाहण्यासाठी परीसरातील कुस्ती शौकीनांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

COMMENTS