Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक आजच घेण्याचे निर्देश

मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स

मुंबई विद्यापीठाला आण्णाभाऊ साठेंचे नाव द्या
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी 19 मे रोजी होणार मुलाखत
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रद्द केल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक

मुंबई : महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार 22 सप्टेंबरला होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात आली होती. दरम्यान, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीच्या स्थगितीच्या विरोधात युवा सेनेने  मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावरुन सुनावणी पार पडली. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका देत 22 सप्टेंबरलाच ही निवडणूक घ्या, असे निर्देश दिले आहेत.  
मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रविवारीच घ्या, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ठाकरेंच्या युवासेनेला मोठा दिलासा मिळाला. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्यावी लागणार असल्याचे बोलले जात आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीबाबत याचिकाकर्ते आणि विद्यापीठ यांच्यात न्यायालयात युक्तीवाद झाला. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे तातडीची सुनावणी पार पडली. राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ यांनी बाजू मांडली.

COMMENTS