अहमदनगर/प्रतिनिधी ः मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी वृध्द महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण लांबविले. ही घटना बालिकाश्रम रस्त्यावरील ब
अहमदनगर/प्रतिनिधी ः मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी वृध्द महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण लांबविले. ही घटना बालिकाश्रम रस्त्यावरील बागरोजा हडको येथे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अज्ञात दोनजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुष्पा दत्तात्रय कारमपुरे (वय 65,रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ, जाधव मळा, बालिकाश्रम रोड) यांनी तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात दोन व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील गंठण बळजबरीने हिसकावून नेले. त्याची किंमत सुमारे 70 हजार रूपये आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रणदिवे करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे मंगळसूत्र चोरांनी डोके वर काढले आहे. सावेडी उपनगरात धुमस्टाईल चोरीच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. रविवारी (दि.21) दुपारी पावणेबारा वाजता बागरोजा हडको परिसरातील बावर्ची हॉटेल जवळ कारमपुरे यांचे साडेतीन तोळ्याचे गंठण मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी हिसकावून नेले.
COMMENTS