Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धान उत्पादन शेतकऱ्यांबाबत घेतलेल्या निर्णयाच स्वागत आहे – राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी - पीएम किसान निधी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पातून क

स्वर्ण डरांगे बारावीत सर्वप्रथम तर गणितात जिल्हयात प्रथम
कोट्यवधींच्या शेअर मार्केट घोटाळ्याचा भांडाफोड लवकरच होणार
महिलांचे आरोग्‍य चांगले, तर कुटुंबाचे आरोग्‍य चांगले डॉ.राज नगरकर

कोल्हापूर प्रतिनिधी – पीएम किसान निधी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून 6 हजार रुपयांचे अनुदान दिलं जाईल. मात्र, या निर्णयावरून राज्यामध्ये शेतकरी आणि शेतकरी संघटनांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. राज्य सरकारच्या या अर्थसंकल्पामध्ये खोली कमी आणि उथळपणा जास्त असेच वर्णन या अर्थसंकल्पाचे करावे लागेल, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. धान उत्पादन शेतकऱ्याबाबत घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS