Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेतील मृतांचा आकडा लपवला

खासदार संजय राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर आरोप

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यू होणार्‍यांचा आकडा वाढत असून, ही संख्या आता 14 वर पोहचली आहे. मात्र विरोध

लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात ; डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 
‘कोकण क्षेत्र विकास व नियोजन प्राधिकरण’ स्थापन करणार  

मुंबई/प्रतिनिधी ः महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यू होणार्‍यांचा आकडा वाढत असून, ही संख्या आता 14 वर पोहचली आहे. मात्र विरोधकांकडून राज्य सरकारला जोरदार धारेवर धरण्यात येत असून, महाराष्ट्र भूषण सोहळा दर्घटनेतील मृतांची संख्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लपवली. यासाठी पोलिस अधिकारी व आरोग्य अधिकार्‍यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकला, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
मंगळवारी पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, स्थानिक हा आकडा 20 पर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. दुर्घटना झाली तेव्हा मृतांचा आकडा सहापर्यंतच सांगावा, असा दबाव एकनाथ शिंदे यांनी पोलिस अधिकारी व आरोग्य अधिकार्‍यावर टाकला, असे आमच्या कानी येत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. संजय राऊत म्हणाले, सरकारच्या निष्काळजीपणामुळे 14 जणांचा बळी गेला आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कार्यक्रमाचे आयोजक, सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री, अशा सर्वांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहीजे. संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते तर नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तालयात जात त्यांनी धुडगूस घातला असता व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुनच ते बाहेर पडले असते. आता त्यांच्यामध्ये माणुसकी शिल्लक असेल तर त्यांनी किमान मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागावा. संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनीदेखईल अन्न व औषध प्रशासन विभागात मोठा भ्रष्टाचार केला, असा आरोप याच विभागाच्या अधिकार्‍यांनी केला आहे. अन्न औषध व प्रशासन विभाग हे काही साधे खात नाही. लोकांच्या जीवनाशी निगडीत हे महत्त्वाचे खाते आहे. राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस याचीही जबाबदारी घेणार नाहीत काय? असा सवाल राऊत यांनी केला आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी देखील सरकारवर टीकेची तोफ डागत, कार्यक्रम केव्हा घ्यावा, त्याची वेळ किती असावी, याचे भान सरकारला आणि प्रशासनाला असू नये, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहेे. दरम्यान, नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 12 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. तर, शेकडो रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता या घटनेबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. झालेले मृत्यू हे उष्माघातामुळे कि चेंगराचेंगरीमुळे झाले? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.

COMMENTS