औरंगाबाद/प्रतिनिधी : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामागील शुक्लकाष्ट काही संपण्याची चिन्हेत नाहीत. महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने टीईटी प
औरंगाबाद/प्रतिनिधी : राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यामागील शुक्लकाष्ट काही संपण्याची चिन्हेत नाहीत. महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने टीईटी परीक्षेत गैरव्यवहार करणार्या विद्यार्थ्यांची यादी जाहिर करत, त्यांना टीईटीची परीक्षा यापुढे देता येणार नाही, असे आदेश काढले होते. त्यामध्ये कृषीमंत्री सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आल्यामुळे खळबळ माजली होती. त्यानंतर सत्तार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीमध्ये तफावत आढळून आल्यामुळे न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आहे. सत्तार यांनी 2019 मध्ये सादर केलेल्या निवडणूक शपथ पत्रातील माहितीमध्ये तफावत आढळली आहे. या संदर्भात सिल्लोड न्यायालयाने नव्याने चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात पूर्ण माहिती न दिल्याप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. सिल्लोडमधील महेश शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ. अभिषेक हरिदास यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली होती. मुख्यत्वे करुन या तक्रारीत म्हटले आहे की, सत्तार यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहर्तेबाबत तफावती आढळून आल्या आहेत. त्या अनुषंगाने सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना सी.आर.पी.सी 202 अंतर्गत तपासाचे आदेश दिले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा व्यवस्थित तपास न करुन सत्तार यांना अभय दिल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे आता न्यायालयाने पोलिसांना पुन्हा एकदा सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
COMMENTS