Homeताज्या बातम्यादेश

खांद्यावर नेला लेकीचा मृतदेह

संभल जिल्ह्यातील एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक आई आपल्या 12 वर्षांच्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालली आहे

आता 17 व्या वर्षीच मतदार ओळखपत्र मिळणार
जितेंद्र आव्हाड हे काहीही चुकीचं बोलले नव्हते – आनंद परांजपे 
VIRAL VIDEO : मास्क नाकाखाली आल्यामुळे पोलिसांनी भयंकर चोपला | Lok News24

संभल जिल्ह्यातील एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक आई आपल्या 12 वर्षांच्या मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन चालली आहे. मुलीचे वडीलही तिथे आहेत. मुलीला साप चावला होता, त्यानंतर पालकांनी तिला रुग्णालयात आणलं. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मुलीचा मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मागितली असता कर्मचाऱ्यांनी हात वर केल्याचा आरोप आहे. अखेर हतबल आईने मुलीचा मृतदेह खांद्यावरून आणला. केबनियाठेर पोलीस स्टेशन हद्दीतील बाबई गावात राहणाऱ्या हरपालच्या 12 वर्षांच्या मुलीला आज सकाळी साप चावला. कुटुंबीयांनी जवळच्या डॉक्टरांकडे धाव घेतली पण मुलीच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नाही, उलट ती आणखीनच बिघडत गेली. मुलीच्या पालकांनी तिला जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. जिल्हा रुग्णालयातच मुलीचे पालक रडायला लागले. मृतदेह नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था नव्हती. त्यावर त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिका आणण्यास सांगितलं, मात्र कर्मचाऱ्यांनी हात वर करून सध्या रुग्णवाहिका उपलब्ध होणार नसल्याचं सांगितलं. कर्मचाऱ्यांचे हे ऐकून आईने आपल्या मुलीचा मृतदेह खांद्यावर उचलला आणि तिथून निघून गेली. हे पाहून त्याचे वडीलही तिच्या मागे गेले. यावेळी कोणीतरी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

COMMENTS