किसान क्रांती संघटनेचे धरणे आंदोलन तूर्त स्थगित

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किसान क्रांती संघटनेचे धरणे आंदोलन तूर्त स्थगित

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री यांच्या उपस्थितीत होणार बैठक

पुणतांबा प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी भेट देऊन को

डॉ. गाडेकर धन्वंतरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. स्वाधीन गाडेकर
दोन महिला कुस्तीपटूंची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड
समृद्धी महामार्गाच्या दुसर्‍या टप्प्याचे आज लोकार्पण

पुणतांबा प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांनी भेट देऊन कोर कमिटी व मंत्री भुसे यांच्या तीन तास चाललेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन सात जून रोजी मंगळवारी मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याने किसान क्रांतीने धरणे आंदोलन तूर्त स्थगित केले आहे
पुणतांबा येथे गेल्या तीन दिवसापासून किसान क्रांती च्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरु होते या आंदोलनाची दखल महा विकास आघाडी सरकारने घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषी मंत्री भुसे यांना पुणतांबा येथे जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घ्यावी असे आदेश दिले होते त्यानुसार मंत्री भुसे यांनी शनिवारी धरणे आंदोलनाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली यावेळी तीन तास चाललेल्या मॅरेथॉन बैठकीत मंत्री भुसे व कोअर कमिटीचे सदस्य यांच्यामध्ये पंधरा मागण्यांबाबत चर्चा झाली मंत्री भुसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून कोर कमिटीच्या सदस्यांचा संपर्क करून देऊन मागण्यांबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली त्यात सकारात्मक चर्चा झाली

COMMENTS