Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चक्रीवादळाने मदारी बांधवांच्या आशेवर फिरवला नांगर

मदत करण्याचे भटक्यांचे नेते अ‍ॅड. डॉ. अरूण जाधव यांचे आवाहन

जामखेड ः जामखेड तालुक्यातील खर्डा येथे संध्याकाळी चक्रीवादळी व जोरदार पावसामुळे खर्डा शहरालगत कानिफनाथ मंदिराच्या पायथ्याशी  यशवंतराव चव्हाण मुक्

नवमतदारांनी केले खासदार डॉ.सुजय विखे स्वागत
मित्राच्या निधनाचा धक्का पचेना, 28 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या | LOKNews24
संगमनेर बस स्थानक विकासकाला साडे तीन कोटींचा दंड

जामखेड ः जामखेड तालुक्यातील खर्डा येथे संध्याकाळी चक्रीवादळी व जोरदार पावसामुळे खर्डा शहरालगत कानिफनाथ मंदिराच्या पायथ्याशी  यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत अंतर्गत नव्याने वीस घरकुलांचे काम सुरू होते. काम पत्रा लेवलपर्यंत आले होते. काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी मदारी बांधव पालाची झोपडी टाकून राहिला होता. परंतु निसर्गाच्या पुढे हात टेकावे लागतात असेच म्हणावे लागेल.
             यावेळी भटक्यांचे नेते अ‍ॅड. डॉ. अरुण (आबा) जाधव यांनी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या कार्यकर्त्यांना घेऊन तात्काळ खर्डा येथे चालू असलेले यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीची पाहणी केली तसेच मदारी बांधवांना धीर दिला. व म्हणाले गेली 50 वर्षापासून भटक्या समाजातील मदारी बांधव खर्डा या ठिकाणी राहतो खूप गरीब व इमानदार समाज आहे. यांना जमीन घरकुल व्यवसाय नाही कला दाखवून शोभेचे वस्तू तयार करून भंगार, काच, पत्रा गोळा करून हा समाज उपजीविका भागवतो. काल झालेल्या पावसामुळे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत बांधकामाचे पडून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेले सात वर्षापासून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी कार्यकर्त्यांना घेऊन संघर्ष करत आलो आहे. अखेर मदारी बांधवांचे स्वप्न होते घरे होतील व घरात जाऊन राहील हे अर्धवट झाले मी आपणास नम्र मनःपूर्वक विनंती करतो की दानशूर व्यक्ती कंपन्या सामाजिक संस्था तरुण मंडळे आपण वीट, वाळू, पत्रे, खिडकी, दरवाजे, सिमेंट याची मदत करावी, तसेच जामखेड तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी यांनी भरपाई नुकसान दखल घ्यावी असे आवाहन अ‍ॅड. डॉ.अरुण जाधव  यांनी केले.यावेळी बबनराव बहिर (ग्रामविकास अधिकारी खर्डा) सुरज पवार (इंजिनिअर साहेब) उमाताई जाधव (ग्रामीण विकास केंद्र सचिव) विशाल पवार (आदिवासी नेते) संतोष चव्हाण सर राजू शिंदे रजनी बागवान व मदारी बांधव उपस्थित होते.

COMMENTS