मजुरीचे पैसे मागितल्याने दाम्पत्यास बेदम मारहाण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मजुरीचे पैसे मागितल्याने दाम्पत्यास बेदम मारहाण

अहमदनगर/प्रतिनिधी : मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून पिता-पुत्रांकडून पती-पत्नीस बेदम मारहाण करण्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल

तुकाराम भंडारे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
आमदार डॉ तांबे यांनी शिक्षक दिनानिमित्त केला दिव्यांग शिक्षकांचा सन्मान
प्रवरेच्या कृषी व संलग्न शास्त्र संस्थेत विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे धडे

अहमदनगर/प्रतिनिधी : मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून पिता-पुत्रांकडून पती-पत्नीस बेदम मारहाण करण्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची माहिती अशी की, पारनेर येथे पानोली रोड परिसरात राहणारा शेतमजूर गंगाराम मच्छिंद्र कुर्‍हाडे (वय 48, मूळ रा. भोर गल्ली, मिरजगाव, ता. कर्जत) हे त्यांची पत्नी सौ. अलका कुर्‍हाडे हिच्यासह दुचाकीवरुन लोणी हवेली येथील शेतकरी मते यांच्या वस्तीवर शेतात कांदे झाकण्याचे काम केलेल्या मजुरीचे 11 हजार 500 रुपये हे पैसे मागण्यासाठी गेले असता शेतकरी भीमाजी मते व त्याचा मुलगा बंड्या मते यांना पैसे मागितल्याचा राग आल्याने शिवीगाळ करीत धारदार चाकूने वार केला. एकाने धरले तर दुसर्‍याने पोटावर, गालावर, खांद्यावर चाकूने भोसकून वार केले व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अलका कुर्‍हाडे हिला लाथाबुक्क्याने मारहाण करुन शिवीगाळ केली. पुन्हा येथे पैसे मागण्यासाठी आला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी गंगारामकुर्‍हाडे यांच्या फिर्यादीवरुन भीमाजी लहू मते, सौरव उर्फ बंड्या भीमाजी मते यांच्याविरुद्ध पारनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी मते पिता-पुत्राला अटक केली असून पोलिस उप निरीक्षक जावळे पुढील तपास करीत आहेत.

COMMENTS