देशाचा विकासदर राहणार 9.1 टक्के ; ‘मुडीज’चा अंदाज

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशाचा विकासदर राहणार 9.1 टक्के ; ‘मुडीज’चा अंदाज

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटातून भारतीय अर्थव्यवस्था सावरली असली तरी, युक्रेन आणि रशिया युद्धाची झळ भारतीय अर्थव्यवस्थेला मोठया प्रमाणावर बसणार यात श

आईच्या आठवणीत होता प्रत्येक क्षण…; रुणाल जरेने व्यक्त केली भावना ; न्याय मिळवून देण्याचा निर्धारही व्यक्त
अज्ञात वाहनाच्या धडकेने दोघांचा मृत्यू
डॉ.उपाध्ये लिखित ’भारतीय कुंभार समाजातील संत’ दिशादर्शक ग्रन्थ ः ह.भ.प. श्रावण महाराज जाधव

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटातून भारतीय अर्थव्यवस्था सावरली असली तरी, युक्रेन आणि रशिया युद्धाची झळ भारतीय अर्थव्यवस्थेला मोठया प्रमाणावर बसणार यात शंकाच नाही. जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव वधारल्यानंतर खाद्यतेलासह अनेक वस्तूंचा महागाईचा भडका उडतांना दिसून येत आहे, याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता जागतिक स्तरावरील पतमापन संस्था ‘मुडीज’ ने देखील व्यक्त केली असून युध्दाच्या परिणामी चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर 9.1 टक्के इतका होऊ शकतो, असे म्हटले आहे. याआधी मुडीजने 9.5 टक्के जीडीपी दराचा अंदाज वर्तवला होता.
कोरोनाच्या संकटानंतर देखील भारतीय अर्थव्यवस्थेने लवकरच उसळी घेत अर्थव्यवस्थेचा गाडा लवकरच रुळावर आणला. मुडीजने गतवर्षी साडेनऊ टक्के दराचा अंदाज व्यक्त केला होता, हा अंदाज वर्तविण्यापूर्वी सात टक्के दराचे भाकीत वर्तविण्यात आले होते. पण आता युध्दाची झळ भारताला बसू शकते, असे सांगत मुडीजने जीडीपी दराच्या अंदाजात कपात केली आहे. धान्य आणि कृषी उत्पादनाच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण आहे. त्यामुळे या क्षेत्रातील वस्तूंच्या वाढीव दराचा फटका बसणार नाही, पण देशाला लागणारे 80 टक्के इंधन विदेशातून आयात करावे लागते. अशा स्थितीत जागतिक बाजारातील इंधनाच्या चढ्या दराचा फटका अर्थव्यवस्थेला बसू शकतो, असे मुडीजचे म्हणणे आहे. केवळ इंधनच नव्हे तर खतांच्या चढ्या दराचा मुकाबलासुद्धा भारताला करावा लागू शकतो, असे सांगत मुडीज पुढे म्हणते की, चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर 9.1 टक्के इतका राहू शकतो तर त्यापुढील वर्षात हा दर 5.4 टक्के इतका राहू शकतो. युद्धाचा फटका केवळ भारताला बसत आहे असे नाही तर जगातील बहुतांश देशाला त्याची झळ पोहोचत आहे. मागणी आणि पुरवठ्याच्या साखळीवर याचा परिणाम झाला आहेच पण उत्पादन खर्च वाढल्यामुळे आगामी काळात महागाईचा भडका देखील उडू शकतो. अर्थ आणि वित्त क्षेत्रात अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.

महागाईचा भडका
रशिया-युक्रेन युद्धामुळे वाढत्या महागाईचा फटका बसू लागला आहे. या युद्धामुळे कच्च्या मालाच्या किमती सातत्याने वाढत चालल्या आहेत. आता कंपन्यांनी हा बोजा ग्राहकांवर टाकण्यास सुरुवात केली आहे.कंपन्यांनी पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि दुग्धजन्य पदार्थ विकणार्‍या कंपन्यांनी याची सुरूवात केली आहे. नेस्लेने मॅगीच्या किमती 9 ते 16 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. त्याच वेळी, एचयूएलने विविध कॉफी उत्पादनांच्या किमती 1.5 ते 14 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. अमूल, पराग आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. किरकोळ बाजारात गेल्या 15 दिवसांत चिकनचे दर 40 टक्क्यांनी वाढले असून ते 200 रुपये किलोवरून 280 रुपये किलो झाले आहेत. त्याचप्रमाणे बटाट्याच्या दरातही 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.एका महिन्यात खाद्यतेलाच्या किमतीतही 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

COMMENTS