Homeताज्या बातम्यासंपादकीय

मनाचा कोपरा आणि कोपऱ्यातील कचरा!

 *मन चिंती, ते वैरी न चिंती", अशी एक मराठीत म्हण आहे; त्याच आशयाचा संत कबीर यांचा एक दोहा आहे त्यामध्ये ते म्हणतात की, पापी देखन मैं चला, मुझसे ब

बाळासाहेबांच्या राजकीय भूमिकेतील अस्पष्टता ! 
महाराष्ट्र पूर्ववत राहू द्या !
‘मूर्तीं’चे नफेखोर षडयंत्र!

 *मन चिंती, ते वैरी न चिंती”, अशी एक मराठीत म्हण आहे; त्याच आशयाचा संत कबीर यांचा एक दोहा आहे त्यामध्ये ते म्हणतात की, पापी देखन मैं चला, मुझसे बडा पापी मिला न कोय! तेव्हा कळलं की, आपल्या मना इतका पापी कोणीच नाही! या दोघांमध्ये  म्हणून असेल किंवा कबीरांचा दोहा असेल, मानवी समाज जीवनाचा अनुभव दडलेला असतो. हा अनुभव अंतरमनातून आलेला असतो, आणि जे अंतर्मनातून येतं ते मनाचे विज्ञान असतं. या मनावर नियंत्रण मिळवणं, ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे. त्यामुळेच मनावर नियंत्रण करणाऱ्या आजच्या आधुनिक जगापेक्षाही मनाच्या एकूण विकारावर विजय मिळवणारी साधना भारतीय समाजात फार प्राचीन  काळीच निर्माण झाली. ज्याला आपण अध्यात्मिक विज्ञान म्हणून विपश्यना देखील संबोधतो. या विपशनेत किंवा साधनेत मनाच्या विकारांचे एक तटस्थपणे निरीक्षण करून, ते बाहेर काढण्याचा मार्ग सांगितला जातो. आज मन किंवा अंतर्मन आणि त्याच्या प्रक्रियेवर लिहायचं नेमकं कारण काय, तर, निश्चितपणे आपल्या आजूबाजूला जगात वेगवेगळ्या ठिकाणी ज्या भयावह घटना घडतात, त्या घटनांना मूर्त आकार देणारी शक्ती हा माणूसच आहे. आपण म्हणतो की, जन्मत: माणूस वाईट नाही. आजूबाजूच्या परिस्थितीच्या संस्काराच्या माध्यमातून माणूस घडतो आणि त्याच्यावर जसे संस्कार होतात, तसा तो घडतो. पण, हाही सिद्धांत मानायचं जर आपण ठरवलं, तर मग शहरांमध्ये, अतिशय बकाल  असणाऱ्या झोपडपट्ट्यांमधून शिक्षण घेऊन मोठी माणसे निर्माण होतात. हे लिहिण्याचं कारण असं की, काही दिवसांपूर्वी आपण बातमी वाचली असेल की, सिडनी शहरातील एका गजबजलेल्या शॉपिंग सेंटर मध्ये ४० वर्षाची एक व्यक्ती येते आणि ती धारदार लांबलचक चाकू घेऊन शॉपिंग सेंटर मध्ये खरेदीसाठी आलेल्या आणि काहीसा विरंगुळा मिळवणाऱ्या स्त्रियांच्यावर थेट हल्ला करते. एक नव्हे, दोन नव्हे तर थेट सहा खून करते. ती व्यक्ती सहा जणांना ठार करते. त्यापैकी पाच स्त्रिया असतात. स्त्रिया त्यांच्यासोबत लहान बाळे आहेत. मुलांना वाचवण्याच्या धडपडीत त्यांनी स्वतःचे प्राण गमावले; परंतु, मुलांना वाचवले. ही सगळी प्रक्रिया चालू असताना एक महिला पोलीस अधिकारी,  नियंत्रणाबाहेर जाऊ पाहणारा जोएल कोची नावाचा तो मनोरुग्ण, त्याच्यावर गोळी झाडते. त्याला ठार करते.  त्या महिलेचे निश्चितपणे स्वागत होतं. ऑस्ट्रेलियासारख्या अतिशय आधुनिक देशांमध्ये मनाची विकृती घेऊन, म्हणजे सतराव्या वर्षापासून ते ४० व्या वर्षापर्यंत म्हणजे जवळपास २३ वर्ष एखादी व्यक्ती समाजात वावरते आहे आणि समाजाला त्याचा साधा गंध नसेल तर, मग आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला किती सैतानी शक्ती वावरत आहे, याचा आपल्यालाच अंदाज नसेल, तर, मानवी जीवन ते कुठेही असो ते निश्चितपणे धोक्यात आहे! आजच्या आधुनिक काळात प्रत्येक गोष्ट मानवाच्या मानसिकतेला आकर्षित करणारी असते.  मग ते एखाद्या वस्तूची जाहिरात असेल किंवा अन्य काय असेल. माणसाला त्या संदर्भात आकर्षण निर्माण करण्याची प्रक्रिया करणे आणि प्रत्यक्षात ती वस्तू तशी नसणं, म्हणजे हा एक प्रकारचा मानसिक आघात जाहिरातीच्या माध्यमातून जसा होतो, तसा एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या घटना प्रसंगातून बनलेलं मन आणि त्याच्या मनात साठवत गेलेल्या गोष्टी आणि त्याचा अगदी स्फोट होणं, हे जेव्हा घडतं, तेव्हा जोएल कोची सारख्या, एक प्रकारच्या विकृती असलेल्या व्यक्तीकडून सैतानी हल्ले मनुष्यमात्रावर होऊ लागतात.  प्राण गमावण्याची पाळी साध्या आणि सहज परिस्थितीत नागरिकांवर येते. ही भीषण परिस्थिती, बरंच काही वर्णन करून जाते. आजार दोन प्रकारचे असतात,  एक शारीरिक आणि दुसरा माणसिक. शारीरिक आजाराची काही लक्षण असतात. म्हणजे ताप, असला अंग गरम लागतं, सर्दी असेल तर नाकात स्त्राव वाहतो, कप असेल तर सातत्याने खोकला येतो. ही जशी लक्षण बाह्य स्वरूपात दिसतात, तशी, मानसिक रुग्ण असणाऱ्यांचीही काही लक्षण निश्चितपणे त्या व्यक्तीमध्ये दिसत असतात. परंतु, समाज त्याकडे दुर्लक्ष करतो. कुटुंब त्याकडे दुर्लक्ष करते. असा मानसिक कचरा घेऊन वावरणारी माणसं कधी ना कधी एकाकी विकृत होतात. ते मानवी जीवनच धोक्यात कसे आणतात, हे कालच्या सिडनी येथील शॉपिंग सेंटर मध्ये झालेल्या हल्ला सत्रातून आपल्याला दिसतं. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आजूबाजूला मनोरुग्न दिसला तर, त्याला त्यापासून परावृत्त कसे करता येईल, हाच बोध या घटनेतून घ्यायला हवा.

COMMENTS