मुंबईमध्ये येत्या 2 डिसेंबरला होणार बारा बलुतेदार महासंघाचे अधिवेशन

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

मुंबईमध्ये येत्या 2 डिसेंबरला होणार बारा बलुतेदार महासंघाचे अधिवेशन

अहमदनगर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील बारा बलुतेदारांच्या सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व आर्थिक समस्यांवर उपाययोजनासंदर्भात विचार विनिमय व धोरण ठरविण्य

LOK News 24 I पाहा अहमदनगरमधील होळी आणि धूलिवंदनाची तयारी
विळद घाटातील अपघातात जळगावच्या दाम्पत्याचा मृत्यू
संभाजी वाळके यांना शब्दगंध उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

अहमदनगर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यातील बारा बलुतेदारांच्या सामाजिक,राजकीय,शैक्षणिक व आर्थिक समस्यांवर उपाययोजनासंदर्भात विचार विनिमय व धोरण ठरविण्यासाठी राज्यव्यापी पहिले अधिवेशन मुंबईतील बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात येत्या 2 डिसेंबरला दुपारी 12 वाजता होणार आहे. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे राहतील. तर राज्याचे ओबीसी कल्याण व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी ग्रामीण मजुरी, कौटुंबिक सेवा पुरविणारा, शेती औजारे, कला कौशल्यांची कामे, निवारा,उद्योग क्षेत्रात मिनी इंडस्ट्रीचा पाया ठरलेल्या बारा बलुतेदार धान्य स्वरूपात मोबदल्यावर वर्षानुवर्ष उदरनिर्वाह करत आलेल्या वर्गाच्या समस्या आजही तश्याच आहेत.त्यांचे दुःख, दारिद्र्य, अवहेलना, अन्याय हे प्रश्‍न आजही सुटले नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती तर अत्यंत डबघाईची आहे.करोना काळात तर फारच हाल झाले. ह्या वर्गांना सत्तेत सहभागाशिवाय त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्याबरोबर शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी ठोस उपाय योजनांवर विचारमंथन होणार आहे. मंत्री वडेट्टीवार या अधिवेशनात बारा बलुतेदार, अलूतेदार, एसबीसी, मायक्रो ओबीसींच्या अन्यायग्रस्त जातींच्या संविधानिक न्याय हक्कांसाठी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख महेश कांबळे यांनी दिली आहे.
मुंबईच्या अधिवेशन व मेळाव्यास विविध समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून यामध्ये साहेबराव कुमावत (बेलदार), सोमनाथ खाडे,अरुण दळवी, प्रकाश मारवाडे, सुनील पावले (साळी),अशोक राऊत,बाळासाहेब सुतार, रमेश आहेर(सुतार),सदाशिव हिवलेकार,विजय पोपालघट (लोहार),प्रतापराव गुरव (गुरव),सतीश दरेकर,अशोक सोनवणे,मोहन जगदाळे,भगवान श्रीमनदीलकर (कुंभार),भगवान वाघमारे,दामोधर बिडवे, (नाभिक),देवराज सोनटक्के,किसनराव जोर्वेकर,विशाल जाधव(धोबी),शशिकांत आमने,ज्ञानेश्‍वर फासे,दत्तात्रय चेचर (कोष्टी),सतीश कसबे(मातंग), अर्जुन भोई (भोई),विजय बिरारी,रवींद्र बागुल(शिंपी),डी.आर.माळी(चर्मकार),राजेश पंडित(सोनार),डी. एन.कोळी (कोळी),धनंजय शिंगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहेत नगर जिल्हातील सर्व बलुतेदार घटकातील बंधू-भगिनींनी मुंबई येथील अधिवेशनास आवर्जून उपस्थित रहाण्याचे आवाहन नगर जिल्हा पदाधिकारी माऊली मामा गायकवाड,अनिल इवळे,शाम औटी,अनुरिता झगडे, छाया नवले,सुभाष बागुल,नितीन डागवले आदींनी केले आहे.

COMMENTS