Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संविधानाचा जागर घरोघरी केला पाहिजे : रमेश मकासरे

श्रीरामपुर : प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये संविधान असले पाहिजे व प्रत्येक भारतीय व्यक्तीने संविधानाचा अभ्यास करून संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठ

निराधार योजनेचा नाही आधार
मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या
अहमदपूर बाजार समितीवर महाविकास आघाडीने मारली बाजी
Displaying IMG-20251127-WA0018.jpg

श्रीरामपुर : प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये संविधान असले पाहिजे व प्रत्येक भारतीय व्यक्तीने संविधानाचा अभ्यास करून संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे असे प्रतिपादन भारतीय कर्मचारी संघाचे राज्य अध्यक्ष रमेश मकासरे यांनी केले. भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित टिळक नगर येथे संविधान जागर अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भारतीय संविधानाने सर्व समाज घटकांना व स्त्रियांना समान हक्क अधिकार बहाल केले आहेत. परंतु या देशांमध्ये शासक वर्गाने संविधानाबद्दल जागृती करण्याचे काम केले नाही उलट संविधानाबद्दल संभ्रम निर्माण करण्याचे काम केले. संविधान  किंवा संविधानाचा प्रभाव नष्ट करण्यासाठी संविधान विरोधी विविध कायदे केले गेले. त्यामुळे बहुजन समाजातील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी सर्व महिला व धार्मिक अल्पसंख्यांक यांनी भारतीय संविधान अभ्यासून त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. महापुरुषांना अपेक्षित असणारे सामाजिक परिवर्तनाचे काम भारतीय संविधान लागू केल्यानंतरच होऊ शकते असे  यावेळी त्यांनी सांगितले.

प्रथम मान्यवरांचा हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमास रांजणरवोलचे उपसरपंच चांगदेव ढोकचौळे, राहाता कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष गायकवाड,  दत्तनगर चे तंटामुक्ती अध्यक्ष रविआण्णा गायकवाड, आरपीआयचे जिल्हाप्रमुख भिमा बागुल, दिलीप त्रिभुवन, प्रभाकर ब्राहणे, बी. के. त्रिभुवन, सलिम पठाण, रवि सुतार, सुनिल वाघमारे, विलास आहिरे, सोमनाथ भाटे, गौतम निळे, भाऊसाहेब त्रिभुवन, अशोक जाधव, बबन पवार आदिसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पी. एस. निकम यांनी केले तर किशोर निळे यांनी आभार मानले.

COMMENTS