Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युती सरकारला लाडकी बहीण नको तर लाडकी सत्ता हवी

आमदार बाळासाहेब थोरात यांची सरकारवर घणाघाती टीका

संगमनेर ः राज्यांमध्ये अशांतता असुरक्षितता वाढली असून कायदा सुरक्षा व्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. अमली पदार्थांचा हैदोस सुरू आहे. बदल्यांमध्ये प्रच

पालकमंत्रीच राहा; मालक बनू नका
नाताळ हा प्रेमाचा व शांतीचा संदेश देणारा सण ः आ. थोरात
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला बिगर खात्याचे मंत्री झेंडावंदनाला जाणार

संगमनेर ः राज्यांमध्ये अशांतता असुरक्षितता वाढली असून कायदा सुरक्षा व्यवस्थेचे वाटोळे झाले आहे. अमली पदार्थांचा हैदोस सुरू आहे. बदल्यांमध्ये प्रचंड घोटाळे वाढले आहेत. भ्रष्टाचाराचा अतिरिक्त झाला असून मंत्रालय हे त्याचे केंद्र झाले आहे. बेकायदेशीरपणे आलेले हे सरकार राज्यातील जनतेला अजिबात मान्य नसून सध्याच्या युती सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण नाहीतर लाडकी सत्ता हवी आहे अशी घाणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून सर्वांनी एकत्रितपणे लढून या सरकारला बदलून टाका असे आवाहन केले आहे.
षण्मुखानंद सभागृह येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी देशाचे ज्येष्ठ नेते खा. शरदचंद्रजी पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींसह राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, राज्यात सत्तेवर आलेले सरकार हे बेकायदेशीर आहे.

हे सरकार लोकांना मान्य नाही .नैतिकदृष्ट्या भाजपाचे चुकीचे राजकारण आहे. सर्व स्वायत्त संस्था गुलाम बनून त्यांनी राजकारणासाठी वापर केला आहे. लोकशाही आणि राज्यघटनेवर आघात करू पाहणार्‍या भाजपाची घमेंड महाराष्ट्राने उतरवली आहे. केंद्रात आता महाराष्ट्राचा आवाज बुलंद झाला आहे .महाराष्ट्राच्या अनेक वाघिणी संसदेमध्ये सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल करत आहेत. विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांच्या पहिल्याच भाषणाने 56 इंच असणार्‍यांच्या छातीमध्ये आता धडकी भरली आहे. लोकशाही व घटना मोडीत काढणे हा भाजपाचा हेतू असून तो अजून संपलेला नाही. अजूनही लोकशाहीवर आघात होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी वाढली आहे. सरकारचे त्याकडे लक्ष नाही. कुर्ला येथील हजारो कोटींची जमीन अवघ्या 25 टक्के दराने चार शब्दांच्या एका ओळीने  दिली आहे. कायदा सुव्यवस्थेचा बोजबारा उडाला आहे. सत्ताधारी आमदार गोळीबार करतो आहे. बदल्यांमध्ये प्रचंड घोटाळे होत आहे. भ्रष्टाचाराचा अतिरेक झाला आहे आणि याचे केंद्र मंत्रालय ठरले असल्याची टीका थोरात यांनी केली. या बैठकीला राज्यभरातील महाविकास आघाडीने व इतर घटक पक्षातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

COMMENTS