Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थोरात कारखान्याचा गुरुवारी गळीत हंगाम सांगता समारंभ

संगमनेर/प्रतिनिधी ः सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022 - 23 या गळीत हंगामाचा सांगता समारंभ

बेस्ट बिफोर नियमाचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करावी
पोलीस इलेव्हन शिरूर ठरले कर्जतच्या पैलवान चषकाचे मानकरी
रॅगिंग ही एक प्रकारची विकृतीच ः न्यायाधीश अलमले

संगमनेर/प्रतिनिधी ः सहकारासाठी दीपस्तंभ ठरलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022 – 23 या गळीत हंगामाचा सांगता समारंभ व सेवानिवृत्त सेवकांचा स्नेहमेळावा गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी सकाळी 9 वा. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, कांचनताई थोरात यांच्या उपस्थितीत व चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना संतोष असे म्हणाले की, माजीमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी कारखान्याने 15 लाख 53 हजार मे. टनाचे उच्चांकची गाळप केले होते. तर या हंगामात 10 लाख मे.टनाच्या वर गाळप झाले आहे. सभासद,शेतकरी,कामगार ऊस उत्पादक या सर्वांच्या हिताचे निर्णय घेत कारखान्याला राष्ट्रीय व राज्य पातळीवर विविध पुरस्कार मिळाले आहेत. संगमनेर तालुका हा एक परिवार असून कारखान्यात अनेक वर्ष सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांचा स्नेहमेळावा व आयुष्याची 75 वर्षे पूर्ण करणार्‍या निवृत्त कर्मचार्‍यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे, बाजीराव पा.खेमनर, दुर्गाताई तांबे, ड.माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, शंकर पा. खेमनर, सुनंदाताई जोर्वेकर, मिलिंद कानवडे, संपतराव डोंगरे, मीराताई शेटे, विश्‍वासराव मुर्तडक, सुधाकर जोशी, लक्ष्मणराव कुटे, राजेश मालपाणी, रामहरी कातोरे, सोमेश्‍वर दिवटे, हौशीराम सोनवणे, सुधाकर रोहम यांसह तालुक्यातील व अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी, ऊस उत्पादक, सभासद व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

COMMENTS