Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सफाई कामगाराने घेतली 10 हजाराची लाच

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातून फिटनेस प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात नंदुरबार आगारातील चालकाकडून लाच मागितली. 10 हजाराची लाच स्वीकारताना

जळगावातील अपघातात तिघांचा मृत्यू
आगामी सण-उत्सवाच्या अनुषंगाने मध्यरात्री पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन
महसूल प्रशासनाच्या मध्यस्थीने आमरण उपोषण घेतले माघार

नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातून फिटनेस प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात नंदुरबार आगारातील चालकाकडून लाच मागितली. 10 हजाराची लाच स्वीकारताना सफाई कामगार व खासगी वाहन चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नंदुरबार जिल्ह्यातील धानोरा ग्रामीण रूग्णालयाचा सफाई कामगार जयेश शंकर तेजी याने लिपिक असल्याचे भासवून एका खासगी वाहन चालक तुकाराम भिला भोई याच्या मदतीने बस आगारातील 55 वर्षीय व्यक्तीकडून 12 हजाराची लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 10 हजारांत ठरले. ही रक्कम पंचांसमक्ष स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सफाई कामगार जयेश तेजी व खासगी वाहनचालक तुकाराम भोई या दोघांना ताब्यात घेतले. 

COMMENTS