मोकाटेवरील दाखल गुन्हा खोटा असल्याचा दावा ; पत्नीचे जिल्हा पोलिस प्रमुखांना निवेदन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोकाटेवरील दाखल गुन्हा खोटा असल्याचा दावा ; पत्नीचे जिल्हा पोलिस प्रमुखांना निवेदन

अहमदनगर/प्रतिनिधी : तोफखाना पोलिस ठाण्यात नगर तालुक्यातील शिवसेनेचे नेते गोविंद मोकाटे यांच्यावर दाखल झालेला महिलेच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा संपूर्ण

घोडेगावच्या पाणी टाकीच्या जागेचा निर्णय ग्रामसभेतच होणार
असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी ई श्रम पोर्टल
कर्जत-जामखेडच्या 158 कोटींच्या कामांवरील स्थगिती उठणार

अहमदनगर/प्रतिनिधी : तोफखाना पोलिस ठाण्यात नगर तालुक्यातील शिवसेनेचे नेते गोविंद मोकाटे यांच्यावर दाखल झालेला महिलेच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा संपूर्ण खोटा दाखल केला असून, तो रद्द करण्याची मागणी मोकाटे यांच्या पत्नी मीना मोकाटे यांनी जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांच्याकडे केली आहे. तसे निवेदन त्यांनी त्यांना दिले आहे.
तोफखाना पोलीस ठाण्यात माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांच्यावर दिनांक 4 डिसेंबर रोजी भा.दं.वि. कलम 376 व 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रकरणी गोविंद मोकाटे यांच्या पत्नी मीना मोकाटे यांनी जिल्हा पोलिस प्रमुख यांना निवेदन देऊन हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे. निवेदनामध्ये म्हटले आहे की, गोविंद मोकाटे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जेऊर गटातून प्रबळ उमेदवार होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय विरोधकांनी राजकीय षडयंत्र रचत एका महिलेमार्फत खोटा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याशी गोविंद मोकाटे यांचा कुठलाही संबंध नाही, असा दावा करून, संबंधित खोट्या गुन्ह्यांमध्ये गुंतविण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता व त्यांना सहकार्य करणार्‍या इतर दोन व्यक्तींची नावे निवेदनात टाकण्यात आली आहेत. पुढे म्हटले आहे की, गोविंद मोकाटे यांना ब्लॅकमेल करून अनेक महिन्यांपासून या व्यक्तींकडून पैशाची मागणी करण्यात येत होती. जी फिर्याद देण्यात आली, ती खोटी असल्याबाबतचे सर्व पुरावे आमच्याकडे आहेत. फिर्यादी तसेच फिर्यादीचे पती व सामाजिक कार्यकर्ता व त्यांना सहकार्य करणार्‍या सर्व लोकांचे मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड व मेसेज तपासणे गरजेचे आहे. तसेच फिर्यादीचे व्हॉट्सअप चॅटिंग, फेसबुक अकाउंट, मेसेंजर, टेक्स्ट मेसेज व कॉलची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पुरावे केले सादर
जिल्हा पोलिस प्रमुखांना संबंधित गुन्हा खोटा व बनावट असल्याबाबतचे सर्व पुरावे सादर करण्यात आले आहेत. पुराव्यांवरुन चौकशी करुन खोटा गुन्हा दाखल करणार्‍या व ब्लॅकमेल करणार्‍या लोकांना तसेच त्यांना सहकार्य करणार्‍या लोकांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी मीना मोकाटे केली आहे.

COMMENTS