शेगाव : शेगाव येथे रविवारी संत गजानन महाराजांचा 146 वा प्रकटदिवस आहे. या निमित्त शेगाव नगरी टाळ मृदुंगाच्या गजराने दुदुमली आहे. मोठ्या प्रमाणात र

शेगाव : शेगाव येथे रविवारी संत गजानन महाराजांचा 146 वा प्रकटदिवस आहे. या निमित्त शेगाव नगरी टाळ मृदुंगाच्या गजराने दुदुमली आहे. मोठ्या प्रमाणात राज्यभरातून भाविक शेगावमध्ये जमले आहे. तब्बल 700 हून अधिक दिड्यांचे आगमन झाले आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रींच्या समाधी मंदिरावर, परिसर आणि प्रवेशद्वारावर रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. शेगाव येथे गेल्या आठवड्यापासून विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात महारुद्रस्वाहाकार, काकडा, भजन, दुपारी प्रवचन सायंकाळी हरिपाठ कीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम केले जात आहे.
COMMENTS