Homeताज्या बातम्यासंपादकीय

आज मुख्यमंत्री कळतील!

राज्याचे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी, आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडलो असल्याचे, अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊ

नकली बंदुकीच्या धाकावर ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न;घटना CCTVमध्ये कैदI LOKNews24
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन नाहीच
सप्टेंबर महिन्यापासून मिळू शकते लहान मुलांना लस ?

राज्याचे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी, आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून बाहेर पडलो असल्याचे, अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. अर्थात, त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळमध्ये महाराष्ट्राचा कसा विकास केला, हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये भरभरून सांगितलं. परंतु, यापुढील काळात महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री येत्या २४ तासात निश्चितपणे मिळतील; परंतु, निकाल जाहीर होऊन पाच दिवस होऊन आणि अभतपूर्व यश मिळवून देखील अद्यापही मुख्यमंत्री ठरवता येत नसल्याने, मुख्यमंत्र्यांच्या स्पर्धेत देवेंद्र फडणवीस यांचे नाव मागे पडते काय, अशी ही एक शंका उपस्थित केली जात आहे. महाराष्ट्रातील तिन्ही पक्ष म्हणजे भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे एक संयुक्त प्रचारपर्व फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आले. त्यामुळे, महायुतीला मिळालेल्या यशामध्ये, या नेत्यांचे कौशल्य आणि परिश्रम याचाही मोठा सहभाग आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमके कोण असतील, यावर आज निश्चितपणे कळेल, कारण हा महिना संपण्यापूर्वीच मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा होईल, हे जवळपास निश्चित आहे. महाराष्ट्राच्या गेल्या अडीच वर्षाच्या सत्ता काळामध्ये महायुतीने अनेक योजना राबवल्या. ‘मी सामान्यांच्या मधला मुख्यमंत्री राहिलो; त्यामुळे, माझ्याकडे येणाऱ्या जाणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा मज्जाव  नव्हता. मी प्रत्येकामध्ये सामान्य म्हणून वावरलो. मी  कार्यकर्ता आहे, होतो आणि राहिल. मुख्यमंत्री पदावर असल्यानंतरही मी कार्यकर्त्यासारखंच काम केलं, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केल्यामुळे, त्यांच्याविषयी सामान्यजणांमध्ये एक प्रकारे सहानुभूती वाढली आहे. अर्थात, महाराष्ट्राच्या महायुतीचे नेतृत्व, देवेंद्र फडणवीस यांनीच केलं; परंतु, केंद्रातूनही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी प्रचाराची धुरा वाहिली. शेवटचे तीन दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचारात नव्हते आणि शेवटच्या दिवशी अमित शहा यांच्या चार सभा रद्द झाल्यामुळे, त्यांनीही प्रचारातून स्वतःला बाहेर केले होते. अशावेळी, देवेंद्र फडणवीस यांनीच राज्याची धुरा वाहिली. याच काळामध्ये विरारमध्ये भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याचे पैसे वाटप कांडही उघडकीस आले. परंतु, त्याचा निवडणुकीवर परिणाम झाला नाही. मतदानापूर्वीची ती घटना असल्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु, प्रत्यक्षात मात्र तसं काहीही घडलं नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लाडक्या बहिण योजनेमुळे आपल्याला घवघवीत यश मिळालं आणि त्याच प्रमाणे आपण लाडका भाऊ आणि अशा प्रकारच्या अनेक योजनांना महाराष्ट्रामध्ये लागू केल्यामुळे, महाराष्ट्रातल्या मतदारांनी महायुतीला अगदी भरभरून मतदान केले, असेही ते म्हणाले. एवढ्या मोठ्या निकालाची अपेक्षा किंबहुना सत्ताधारी असलेल्या महायुतीलाही एवढा विश्वास नव्हता; एवढी भरभरून मते मिळाल्याचेही या संदर्भात त्यांनी म्हटले. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे नव मंत्रिमंडळ लवकरच गठीत होईल. त्यामुळे महाराष्ट्र आणखी विकासाच्या दिशेने वेगवान पद्धतीने वाटचाल करेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. महाराष्ट्राच्या मतदारांना देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटतं. परंतु, पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करतात, हे मात्र आता काही तासातच आपल्याला बघायला मिळेल.

COMMENTS