Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा

मुंबई  : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक विषयक कामकाजाचा भारत निवडणूक आयोगाने नियुक

मंदिरात चोरीप्रकरणी अज्ञात विरोधार्थ गुन्हा दाखल
क्रूरतेचा कळस : १४ वर्षीय मुलीवर २९ जणांनी केला सामूहिक बलात्कार…
सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्या !

मुंबई  : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील निवडणूक विषयक कामकाजाचा भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी नुकताच आढावा घेतला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीला मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, ‘30-मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, ‘31-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, राज्य निवडणूक महानिरीक्षक एम. के. मिश्रा, राज्य निवडणूक महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) धर्मेंद्र गंगवार, ‘31-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघाचे महानिरीक्षक राजीव रंजन, ‘30-मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघाचे महानिरीक्षक गौरी शंकर प्रियदर्शी, ‘मुंबई दक्षिण मध्य’ व ‘मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मुकेश सिंह, ‘30-मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक (खर्च) रविंदर सिंधू, ‘31-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक (खर्च) मुकेश जैन, पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, मुंबई दक्षिण विभाग अपर पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, मध्य मुंबई अपर पोलीस आयुक्त अनिल पारसकर, समन्वय अधिकारी (आदर्श आचारसंहिता) उन्मेष महाजन, समन्वय अधिकारी (कायदा व सुव्यवस्था) तेजूसिंग पवार, प्रमुख समन्वय अधिकारी (स्वीप) फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शामसुंदर सुरवसे, समन्वय अधिकारी (खर्च) राजू रामनानी, समन्वय अधिकारी (तक्रार व्यवस्थापन-निवारण व मतदार हेल्पलाईन ) राजू थोटे, समन्वय अधिकारी (राज्य उत्पादन शुल्क) प्रवीण तांबे आदींसह मुंबई शहर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. मतदान केंद्रांवर सुरळीत व वेळेत मतदान होण्यासाठी पूर्व नियोजन, मतदारांच्या नियोजनबद्ध रांगा तयार करणे, मतदारांना मतदान केंद्रावर मोबाइल नेण्यास प्रतिबंध, उष्णतेच्या लाटेत मतदानाच्या दिवशी उष्माघातापासून बचावासाठी मतदारांना मतदान केंद्र परिसरात इलेक्ट्रॉल पावडर व पिण्याचे पाणी व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात वैद्यकीय पथक सज्ज ठेवणे, भरारी पथके, स्थिर सनियंत्रण पथक दुरछायाचित्र  सनियंत्रण पथक सर्व्हेलन्स टीम, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीमने केलेल्या कामाबाबत माहिती देण्यात आली. मतदार यादीत नावनोंदणी मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून सुमारे 60 हजार मतदारांची नव्याने नोंदणी केल्याबाबत माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे तळ मजल्यावर असून मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात सखी महिला मतदान केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्र तयार करण्यात आले असल्याचे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले. मुंबई शहर जिल्ह्यात मतदान शांततेत व सुरळीत पार पडणार, असा विश्‍वास व्यक्त करीत पोलीस व निवडणूक यंत्रणेत योग्य समन्वय ठेवावा, मतदान केंद्रांवर कार्यरत कर्मचार्‍यांना त्यांच्या कर्तव्य व जबाबदार्‍या समजावून सांगाव्यात, मतदान केंद्रांवर कर्मचार्‍यांना तांत्रिक अडचण आली तर आपत्कालीन परिस्थितीत कोणाशी संपर्क साधायचा याबाबत संबंधित कर्मचार्‍यांना माहिती द्यावी, निष्पक्ष, शांततेत निवडणूका पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी संबंधित अधिकार्‍यांना केल्या.

COMMENTS