Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यावसायिकाने पोलिस ठाण्यातच घेतले पेटवून

पुणे : पुण्यात लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस निरीक्षकांच्या हप्तेखोरीला कंटाळून एका बारमालक असलेल्या तरुणाने पोलिस ठण्यातच स्वत:ला पेटवून

अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात जात पडताळणी प्रस्ताव स्वीकृती व प्रमाणपत्राचे वाटप
उरण रेल्वे स्टेशन ते कोटनाका रस्त्यावर पथदिवे लावण्याची त्रस्त नागरिकांची प्रशासनास मागणी
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाची प्रवेशोत्सव फेरी उत्साहात

पुणे : पुण्यात लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस निरीक्षकांच्या हप्तेखोरीला कंटाळून एका बारमालक असलेल्या तरुणाने पोलिस ठण्यातच स्वत:ला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे याच प्रकारची आणखी एक घटना काही दिवसांपूर्वी वाघोली येथे घडली होती. यात पोलिस चौकीच्या बाहेरच स्वतःला पेटवून घेत तरुणाने आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा असाच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्रासलेल्या बारमालकाने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला रोखल्याने मोठी दुर्घटना टळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्यम गावडे असे स्वत:ला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या तरुणाचे नाव आहे. सत्यम गावडेचा वाघोली येथे बार असून तो नियमानुसार रात्री दीड नंतर बंद करणे गरजेचे असतांना हा बार रात्री उशिरापर्यंत बार सुरू असल्याचे सांगून महिनाभर बार बंद ठेवावा लागेल अशी तंबी लोणीकंद पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकार्‍यांने दिली. एवढेच नाही तर त्याला पोलिस आयुक्तांचे आदेश आहेत, असे देखील सांगण्यात आले आणि बार बंद ठेवावा लागेल असे म्हणत एका महिला अधिकार्‍याने दमबाजी केल्याचा आरोप देखील सत्यम गावडे या तरुणाने केला आहे.

COMMENTS