Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्याजवळ झाडावर आदळून बसचा चेंदामेंदा

भीषण अपघातात 30 प्रवासी जखमी

पुणे : जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या जयवतजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जात असलेली बस झाडावर आदळल्याने अपघात झाला आहे. पुण

टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण | LOKNews24
भोजडे येथील मुस्लिम समाजाचा सामुदायिक विवाह सोहळा कौतुकास्पद – विवेक कोल्हेे
जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी नको : छगन भुजबळ

पुणे : जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या जयवतजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जात असलेली बस झाडावर आदळल्याने अपघात झाला आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावर यवत जवळ झालेल्या या अपघातात जवळपास 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. अपघात झालेली ही बस पंढरपूरहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र, पुणे जिल्ह्यातील यवतजवळ असलेल्या सहजपूर गावाच्या हद्दीत या बसला अपघात झाला. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत, मदतकार्य सुरू केले होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनानेही घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, झाडावर आदळेल्या बसची फोटो पाहिल्यानंतर अपघाताची तीव्रता लक्षात येते. या अपघातात बसचा चेंदामेंदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

COMMENTS