अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरणार वादळी

Homeताज्या बातम्यासंपादकीय

अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरणार वादळी

मलिकांचा राजीनामा, ईडीच्या छाप्यावरून विधीमंडळात पडसाद उमटणार

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज गुरूवारी सुरूवात होणार आहे. मात्र या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी

हायहोल्टेज ड्रामा आणि भाजपचा विजय
एका नव्या युद्धाची नांदी
कृत्रिम बुद्धीमत्तेचे दुधारी शस्त्र

मुंबई/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज गुरूवारी सुरूवात होणार आहे. मात्र या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी सुरू केल्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता असून, राज्यात पडणार्‍या अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या छाप्यावरून सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड उठवण्याची शक्यता आहे. राज्यपाल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद देखील विधीमंडळात उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विरोधक सत्ताधार्‍यांना घेरण्याची तयारी करत असले तरी, सत्ताधारी देखील भाजपला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनात या मुद्द्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरवर शरद पवार यांनी तातडीने बैठक बोलावली होते. यासाठी राज्यातील महत्वाचे नेते आणि राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीत मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचे पक्षाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय या बैठकीत कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला अजित पवार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, रामराजे निंबाळकर आणि अदिती तटकरे सह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, खोटे नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे, ही भाजपची कार्यपद्धती आहे. विरोधकांना ही चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमी प्रमाणे आमंत्रण दिले जाईल, पण ते नेहमी प्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. चहापाण्याला येण्याचे त्यांनी विरोधकांना आवाहन केले आहे. सोबत चर्चे अंती सर्व प्रश्‍न सुटत असतात, असे पाटील म्हणाले.


दाऊदशी व्यवहार करणार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न ः फडणवीस
राज्यात कोणतीच यंत्रणा सक्षमपणे राबविली जात नसून, दाऊदशी व्यवहार करणार्‍यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न राज्यसरकार कडून सुरू आहे. संजय राठोड यांचा राजीनामा लगेच मंजूर होतो; पण दाऊदशी व्यवहार करणार्‍यांना पाठीशी घालणार्‍या सरकारला आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात जाब विचारणार आहोत, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. या वेळी फडणवीस म्हणाले, राज्यातील सरकारमध्ये अजित पवार यांच्या शब्दाला कोणतीही किंमत राहिलेली नाही. सगळा कारभार अनागोंदी सुरू आहे. शेतकरी हवालदिल असताना त्यांच्या प्रश्‍नावर सरकारचे लक्ष नाही. राज्यात विजेचे संकट जोरात सुरू आहे.

COMMENTS