Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण-ढेबेवाडी मार्गावरील पूल पाण्याखाली तर कराडजवळ महामार्गावर पाणीच पाणी

कराड शहराजवळील सहापदरीकरण पुलाच्या कामामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. वाहनचालकांना कसरत करावी लागत असल्याने वाहतूक मंदावली होती. कराड / प

 बुलढाणा जिल्ह्यात नाफेड कडून 11 हरभरा खरेदी केंद्रांना मान्यता
‘सोनहिरा’ च्या अध्यक्षपदी आमदार मोहनराव कदम बिनविरोध
सातारा जिल्ह्यातील पाच कारखान्यांकडून एफआरपी पूर्ण

कराड / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात पावसाने कालपासून चांगलाच जोर धरला असून सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. सातारा जिल्ह्यात चालू वर्षी पहिल्यादांच संपूर्ण जिल्हा पावसाने व्यापला आहे. यामध्ये दुष्काळी माण, खटाव व कोरेगाव तालुक्यात या पावसाने हजेरी लावली आहे तर कराड व पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कराड शहर ते वाठार या मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. पाटण- ढेबेवाडी मार्गावरील मुंद्रुळकोळे येथील पूलावर पाणी आल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे.
आज दुपारी झालेल्या पावासामुळे पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागाला गेल्या दोन ते तीन तासापासून मुसळधार पावसाने झोडपले असून पाटण- ढेबेवाडी मार्गावरील मंद्रुळकोळे येथील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे ढेबेवाडीतून पाटण रोडला जाणार्‍या काही गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच वांग नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आलेले पाहायला मिळत आहे. तसेच काळगाव येथील गावात जाणार्‍या मार्गावर पाणी आले होते. मारूल हवेली येथेही काही ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर साचले होते. कराड तालुक्यातील आटके टप्पा येथील सर्व्हिस रोडवर गुडघाभर पाणी साचले होते. त्यातून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागली. तसेच कराड शहराजवळील सहापदरीकरण पुलाच्या कामामुळे ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असल्याने वाहतूक मंदावली होती. वाठार येथे फूटभर पाणी महामार्गावर साचलेले होते.
हवामान खात्याचा सातारा जिल्ह्याला सावधानतेचा इशारा
हवामान खात्याने सातारा जिल्ह्याला पुढील 3 ते 4 तास आज दि. 1.10.2023 रोजी 4 वाजता सावधानतेचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात 30-40 किमी प्रतितास वेगाने गडगडाटासह वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 3-4 तास घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन आयएमडी मुंबई यांनी केले आहे.

COMMENTS