Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सीमाभागातील ऊस आंदोलन पेटले

कोल्हापूर ः दिवाळीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी या

कुंभमेळा प्राधिकरणाचा कायदा लवकरच : मुख्यमंत्री फडणवीस
मांजरी माथा व वाघदरी हे गाव विकासापासून कोसोदूर
उस्माननगर येथे डॉ.बाबासाहेब  आंबेडकर जयंतीचे आयोजन

कोल्हापूर ः दिवाळीच्या तोंडावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष झाला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत मंगळवारी 22 वी ऊस परिषद पार पडल्यानंतर बुधवारी आंदोलन सुरू झाले आहे. येत्या 3 दिवसात कारखानदारांनी निर्णय घ्यावा. अन्यथा दिवाळीनंतर आक्रमक आंदोलन करू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. यानंतर शेतकरी आक्रमक झाले आहेत. सीमाभागात ऊस आंदोलन चिघळलं आहे. सीमाभागातून महाराष्ट्रात येणारे ट्रॅक्टर पेटवले आहेत. कारदगा परिसरात शेतकर्‍यांनी आंदोलन केलं.

COMMENTS