Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत वरळी सी फेसवर गोणीत आढळला तरुणीचा मृतदेह

मुंबई- मुंबईत एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. वरळी सी फेस येथे गोणीत भरुन हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. मृतदेह आढळल्

बेबळा नदीत ट्रॅक्टरसह 5 जण वाहून गेले.
शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू : पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार
65 वर्षांच्या म्हाताऱ्याने घेतला निरागस चिमुकलीचा गैरफायदा | LOKNews24

मुंबई- मुंबईत एका अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. वरळी सी फेस येथे गोणीत भरुन हा मृतदेह फेकून देण्यात आला होता. मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, तरुणीची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसंच अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरळीत एका तरुणीचा मृतदेह आढळला असून तो गोणीत भरलेला होता. आम्हाला याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झालो होतो. यानंतर आम्ही मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी पाहणी केली असता तरुणीचे हात आणि पाय मोडले असल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी आम्ही अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सध्या सुरु असून तरुणीचीही ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरु आहे.

COMMENTS