पुलावरून पाणी वाहत असल्याने रुग्णवाहिकेत अडकला मृतदेह.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुलावरून पाणी वाहत असल्याने रुग्णवाहिकेत अडकला मृतदेह.

गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह पुरातून गावाला नेण्यात आला

वर्धा  प्रतिनिधी- रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक नदीनाल्याना पूर आला आहेय..यात अनेक पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क त

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस
कोकणात 15 तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
मुंबईसह ठाण्यात पावसाचा धुमाकूळ

वर्धा  प्रतिनिधी- रात्रभरापासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक नदीनाल्याना पूर आला आहेय..यात अनेक पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, हिंगणघाट(Hinganghat) तालुक्यातील पिपरी- जंगोना वेणी(Pepper- Jangona braid) रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने नागपूर येथून वेणी रुग्णवाहिकेने नेत असलेला मृतदेह पुरामुळे अडकला. अखेर मृतदेह रुग्णवाहिकेतून काढून पुरातून गावाला नेण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, वेणी येथील हर्षद घोरपडे(Harshad Ghorpade) (36) आजारामुळे नागपूर येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला. नागपुर येथून वेणी गावाला मृतदेह नेताना वाटेत वेणी जाणगोना रस्त्यावर असलेल्या पुलावरून पाणी असल्याने रुग्णवाहिका प्रेत घेऊन जाऊ शकत नसल्याने गावकऱ्यांच्या मदतीने घोरपडे यांचा मृतदेह पुरातून गावाला नेण्यात आला.

COMMENTS