Homeताज्या बातम्यादेश

देशातील सर्वात मोठा ‘ऑटो शो’ आजपासून सुरू

नवी दिल्ली- ऑटो एक्स्पो कंपोनंट शोचे आयोजन प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे केले जात आहे. तर ऑटो एक्स्पो मोटर शो ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आ

Maruti Suzuki ला मोठा झटका.
नाशिक मंडळामध्ये वीजचोरीविरुद्ध मोहीम एकाच दिवसात २६१ जणांवर कारवाई
व्होडाफोनमधून 1000 कर्मचार्‍यांची होणार कपात

नवी दिल्ली- ऑटो एक्स्पो कंपोनंट शोचे आयोजन प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे केले जात आहे. तर ऑटो एक्स्पो मोटर शो ग्रेटर नोएडा येथे आयोजित करण्यात आला आहे.  11 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान ऑटो एक्स्पो 2023 चे आयोजन करण्यात येणार आहे. पहिले दोन दिवस म्हणजे 11 जानेवारी आणि 12 जानेवारी हे माध्यमांसाठी राखीव असतील. दुसऱ्या दिवशी म्हणजे 13 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत व्यापार्‍यांसाठी ते खुले राहील. 14 जानेवारी ते 18 जानेवारी दरम्यान ऑटो एक्स्पो सर्वसामान्यांसाठी खुला असेल. हा शो दररोज सकाळी 11 वाजता सुरू होईल. यातच बंद करण्याची वेळ 14-15 जानेवारी रोजी 8 PM, 16-17 जानेवारी रोजी 7 PM आणि 18 जानेवारी रोजी 6 PM आहे. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये अनेक कंपन्या त्यांच्या नवीन वाहनांचे प्रदर्शन आणि लॉन्च करताना दिसतील. एका रिपोर्टनुसार, 114 हून अधिक कंपन्या या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. या इव्हेंटमध्ये ऑटोमेकर्सकडून सुमारे 48 नवीन लॉन्च केले जाऊ शकतात. देशातील सर्वात मोठी कार कंपनी, मारुती सुझुकी यावेळी मेटाव्हर्सच्या माध्यमातून आपली वाहने व्हर्चुअली सादर करू शकते.

COMMENTS