अकोले /प्रतिनिधी : भगवान कृष्ण हा पूर्ण अवतार असून, कृष्ण हा जीवनाचा मार्गदर्शक आहे. जीवनातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर कृष्ण चरित्रात आहे. कृष्
अकोले /प्रतिनिधी : भगवान कृष्ण हा पूर्ण अवतार असून, कृष्ण हा जीवनाचा मार्गदर्शक आहे. जीवनातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर कृष्ण चरित्रात आहे. कृष्ण चरित्राचा अभ्यास केला तर जीवनात समस्या निर्माण होत नाही. असे मत ह.भ.प.जगदीश महाराज जोशी त्र्यंबकेश्वर यांनी व्यक्त केले.
अगस्ती ऋषी देवस्थान ट्रस्ट,अकोले येथे अधिकमास पुरुषोत्तम मास निमित्ताने आयोजित अखंड हरीनाम सोहळा श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी व गाथा पारायण सांगता समारंभ काल्याचे कीर्तन ह.भ.प. जगदीश महाराज जोशी यांनी कंठी धरीला कृष्ण मनी,अवघा जनी प्रकाश,काला वाटू एकमेका, वैष्णव निका संभ्रम,या तुकाराम महाराज अभंगावर निरूपण केले. याप्रसंगी योगी केशव बाबा चौधरी, संत साहित्याचे अभ्यासक गुरुवर्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, स्वामी विवेकानंद ट्रस्टचे विश्वस्त दिलीपजी महाजन, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विवेक महाराज केदार, पांडुरंग महाराज फरगडे, सुनील महाराज मंगळापूरकर, हे उपस्थित होते
जोशी महाराज म्हणाले की, देवाच्या बाबतीत खोट बोललं तरी खर होत. गोपिकांनी संबंध प्रेमाचा जोडला, मनात कोणतीही भावना धरा पण देवा विषयी धरा उद्धार झाले शिवाय राहणार नाही. घरातील देवाची पूजा अन स्वयंपाक स्वतः करावेत. कार्यक्रमचे नियोजन अध्यक्ष के.डी.धुमाळ, मनोहर महाराज भोर, दिपक महाराज देशमुख, राजेंद्र महाराज नवले, गुलाबराव शेवाळे, व्यवस्थापक रामनाथ मुतडक यांनी केले.यावेळी प्रा. डॉ. मच्छिन्द्र मालुंजकर यांनी लिखित अमृतवाहिनी प्रवरा या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रम ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ बद्रीशेठ मुंडदा, हरिपाठ काकडा, गाथा व नियमाचे भजन दौलत महाराज शेटे, मृदूंगमणी ज्ञानराज पापळ, संकेत आरोटे, गणेश महाराज वाकचौरे, हार्मोनियम वादक पोपट दिवटे,गायकवृंद विनायक नाईकवाडी, तुकाराम आरोटे, नितीन देशमुख, इंद्रभान कोल्हाळ, चंद्रकांत महाराज चौधरी, विशाल महाराज वाघमारे, संदीप महाराज थोरात, ज्ञानेश्वर महाराज नाईकवाडी, रोहित महाराज राक्षे, दिपक महाराज साबळे,साहेबराव घुले, विणेकरी चंदूबाबा पुंडे, भिवाजी पुंडे यांनी कार्य केले.
COMMENTS