भोंगे उतरत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोंगे उतरत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा इशारा

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात जोपर्यंत मशीदीवरील भोंगे उतरविले जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा मनसेप्रम

अहमदनगरच्या लक्सझरीं बस असो.च्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिलाताई पवार स्वागत
Yeola : नगर – मनमाड महामार्ग रोखला…. (Video)
लायन्स क्लब राहता अध्यक्षपदी इंजि. प्रकाश सदाफळ

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात जोपर्यंत मशीदीवरील भोंगे उतरविले जात नाही, तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. मुंबईतील 1140 पैकी 135 मशिदींवर (दि.4) पहाटे पाचची अजाण झाली. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी मनसे नेत्यांवर कारवाई का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.
माध्यमांना संबोधित करतांना राज ठाकरे म्हणाले की, आज सकाळपासून महाराष्ट्रातील मनसे नेते, पदाधिकारी यांना पोलिसांचे फोन येऊ लागले आहेत. कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्या जात आहेत. परंतु आमच्यावरच कारवाई का केली जात आहे. मुंबईतील 1140 पैकी 135 मशिदींवर आज पहाटे अजान झाली. त्यांच्यावर कारवाई होणार का ? असा सवालही त्यांनी केला. 90 टक्के ठिकाणी सकाळची अजाण झाली नाही. मुंबईतील 1005 मशिदीवर भोंगे लागले नाहीत. त्या मशिदींतील मौलवींचे आभार मानतो, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरत नाहीत, तोपर्यंत मनसेचे हनुमान चालिसा आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. भोंग्यांचा धार्मिक नव्हे, तर सामाजिक विषय आहे. मशिदींना वर्षभरासाठी परवानगी कशी मिळते, असा सवाल करत आमच्या सणांना 10 दिवसांसाठी परवानगी मिळते. असेही ते म्हणाले. अनधिकृत मशिदीवर भोंगे लावण्याची परवानगी मिळाल्यास हनुमान चालिसा लावणार. कुणीही धार्मिक रंग दिला तर आम्हीही त्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र सैनिकांना, हिंदू बांधवांना हेच सांगायचे की हा एका दिवसाचा विषय नाही. हनुमान चालिसाशिवाय समजणार नसेल तर दुप्पट आवाजात वाजवा. मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस काय कारवाई करणार हे एकदा समजू दे. ते धर्माला घट्ट राहणार असतील तर आम्हालाही रहावे लागेल. 365 दिवस दिवसभरात चार, पाच वेळा लावणार असाल तर आम्हाला नाही ऐकायचे. यांचा धर्म माणुसकीपेक्षा मोठा आहे का? पोलिसांनी हे भोंगे खाली आणले पाहिजेत. जी प्रार्थना करायची ती मशिदीत करा, असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

… तर, हनुमान चालीसा वाजणारच…
आपल्या भूमिकेवर सविस्तर बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, दिवसभर जी काही चार-पाच वेळा बांग दिली जाते, त्यांची प्रार्थना म्हणतात, ती जर परत त्यांनी दिली, तर आमचे लाक त्या त्या वेळा हनुमान चालीसा वाजवणार म्हणजे वाजवणार. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन तुम्हाला करायचे असेल, तर त्यांनी दिलेल्या डेसिबलचे पालन करावेच लागेल. लोकवस्तीमध्ये 45 ते 55 डेसिबलपर्यंत स्पीकर लावू शकतात. आम्हाला सणासाठी दिवस बघून परवानगी देता आणि त्यांना मात्र 365 दिवस परवानगी देता, ती कशासाठी, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी यावेळी केला.

COMMENTS