Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांगांच्या वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा

आमदार बच्चू कडू यांचे आवाहन ; विशेष कार्यक्रमात दिव्यांगांना विविध योजनांचा लाभ

अहमदनगर/प्रतिनिधी जीवन जगत असताना दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु अत्यंत आत्मविश्‍वासाने दिव्यांग जीवन जगत असुन त्यांच

अखेर बच्चू कडू यांनी सोडला मंत्रिपदावरचा दावा
शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यास सरकारला वेळ नाही : छत्रपती संभाजीराजे यांची सडकून टीका
तरुणांनी राजकारणात येण्याची हिच खरी वेळ – विनोदसिंग परदेशी

अहमदनगर/प्रतिनिधी जीवन जगत असताना दिव्यांग बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु अत्यंत आत्मविश्‍वासाने दिव्यांग जीवन जगत असुन त्यांच्या जीवनातील दु:ख आणि वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. दिव्यांगांना आवश्यक असलेल्या लाभासाठी गावोगावी सर्वेक्षण करावे, असे प्रतिपादन ’दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले. केडगाव येथील निशा लॉन्स येथे  ’दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानाअंतर्गत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण राधाकिसन देवढे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना युडीआयडी ओळखपत्र व आधार ओळखपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम राबवावी. मुकबधीर मुलांच्या शाळांकडे विशेष लक्ष देताना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यांच्यातील गुणवत्तेला प्रोत्साहन द्यावे. अधिकार्‍यांनी प्रत्येक शाळांना भेट देऊन तेथील अडचणी समजुन घेऊन त्या सोडविण्यासाठीही प्रयत्न करावेत. जिल्ह्यात अनेक दिव्यांग बांधव आहेत ज्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेला नाही. दिव्यांगांना शासनाच्या कोणत्या लाभाची आवश्यकता आहे हे पहाण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका यासारख्या ग्रामस्तरावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांमार्फत सर्वेक्षणाचे काम गतीने पुर्ण करण्यात यावे.  दिव्यांगांना देण्यात येणार्‍या शासकीय योजनांच्या लाभाबाबत तसेच त्यांच्या अडचणी व प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रशासनाने कार्य आराखडा तयार करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी शिबिरासाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक दिव्यांगापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणुन घेत त्यांची निवेदने स्वीकारली.

दिव्यांगांचे आशीर्वाद लाखमोलाचे ः आ. कडू – मुख्य मार्गदर्शक व आमदार बच्चू कडू म्हणाले, दिव्यांगांच्या कल्याणासाठी आपण गेली 15 वर्षापासून सातत्याने काम करत आहे. जीवन जगत असताना दिव्यांगांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. दिव्यांगांना त्यांच्या अडचणी व प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयात येणे शक्य होत नसल्याने ’दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’  हे अभियान राबविण्यात येत आहे. हे  अभियान केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता प्रशासनाने दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेत आठवड्यातील एक दिवस दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी राखीव ठेवावा. दिव्यांगांच्या अडचणी, समस्या दूर झाल्यानंतर हृदयापासून मिळणारे आशिर्वाद लाखमोलाचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

COMMENTS