अहमदनगर/प्रतिनिधी ः अंधारात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारीत असलेल्या पुणे जिल्ह्यातील आरोपींना हत्यारासह व गाडीसह श्रीरामपूर शहर पोलिसांनी पकडले.
अहमदनगर/प्रतिनिधी ः अंधारात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारीत असलेल्या पुणे जिल्ह्यातील आरोपींना हत्यारासह व गाडीसह श्रीरामपूर शहर पोलिसांनी पकडले. ही घटना श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर शिरसगाव शिवारात ओव्हरब्रीजजवळ घडली आहे.
या कारवाईत खलील महेबुब कुरेशी (वय 45, रा. शनि मंदिरासमोर, शुक्रवार पेठ, जुन्नर, जि. पुणे), तुषार अरुण रोकडे (वय 24, रा. भीमनगर, पाडळी नाका,नं.1,जुन्नर, जि. पुणे), अरबाज कुतुबद्दीन शेख (वय 21, रा. बारव, जुन्नर, जि. पुणे), तौफिक हबीब इनामदार (वय 34, रा. आगरपेठ, जुन्नर जि. पुणे), मोबीन रशीद आत्तार (वय 20, रा. नारायणगाव बसस्टॅण्डच्या मागे, ता. जुन्नर जि. पुणे) यांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान समीर शिंदे (रा. जुन्नर) हा पळून गेला. पकडलेल्या दरोडेखोरांकडून पोलिसांनी 1 लाख 88 हजार 240 रुपांचा ऐवज जप्त केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या सूचनेप्रमाणे शहर पोलिस रात्री पेट्रोलिंग करत असताना पहाटेच्या 2.30 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर शिरसगाव शिवारात ओव्हर ब्रीजजवळ रोडच्या बाजूला अंधारात काही आरोपी गाडीसह संशयितरित्या दिसून आले. पोलिसांनी तातडीने ती गाडी पकडली व काही आरोपींना पकडले. पकडलेल्या आरोपींजवळून मोबाईल हॅण्डसेट, रोख रक्कम, धारदार चाकू, व्हेक्सा ब्लेड, नायलॉन दोरी, लोखंडी कटावणी असा 1 लाख 88 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात पोलिस नाईक साईनाथ राशीनकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
COMMENTS