Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या आरोपीस चोवीस तासात अटक 

अहमदनगर/प्रतिनीधी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने मोटारसायकलवर बसवून लिफ्ट देऊन निर्जन स्थळी नेऊन चाकूने वार करून खून करणाऱ्या दोघांना स्थानिक

पाच लाखाची खंडणी मागितली, पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल
अज्ञात ड्रोन खाली उतरले…पारनेरकर झाले हवालदिल…
10 हजार थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत

अहमदनगर/प्रतिनीधी जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने मोटारसायकलवर बसवून लिफ्ट देऊन निर्जन स्थळी नेऊन चाकूने वार करून खून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफिने अटक केली.

या बाबतची माहिती अशी की, नवनाथ दादासाहेब चौधरी, ( वय ४१, रा. भैरवनाथनगर, गोंधवणी, ता.श्रीरामपूर ) यांचा मयत भाचा सुधीर अशोक कांदे ( वय ३५,रा. गोंधवणी, ता. श्रीरामपूर ) यास अनोळखी इसमाने अज्ञात कारणासाठी धारदार हत्याराने भोसकुन, जखमी करुन जिवे ठार मारले होते. या घटनेबाबत राहाता पोलिस ठाण्यात भादविक ३०२ प्रमाणे खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक राकेश ओला, यांनी पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना ना उघड खुनाचे गुन्ह्याचा समांतर तपास करुन, गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते. या आदेशा प्रमाणे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांचे पथक नेमून ना उघड गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. या सुचनाप्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन दोन संशयीत मिळुन आल्याने त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. ताव्यात घेतलेल्या दोघांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे मथुर विजय काळे ( वय २१,रा. रेणुकानगर सुतगिरणी, ता.श्रीरामपूर ) किरण सुरेश काकफळे ( वय २४, रा. रमानगर, सुतगिरणी, ता. श्रीरामपूर ) असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे  गुन्ह्याबाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी करता त्यांनी मयत इसम रस्त्याने पायी जाताना त्यास लिफ्ट देण्याचा बहाण्याने मोटारसायकलवर बसवुन निर्जनस्थळी नेवुन लुटण्याचे उद्देशाने चाकुने मारुन

जखमी करुन जिवे ठार मारुन त्याचा मोबाईल फोन घेवुन गेलो अशी हकिगत सांगितल्याने दोन्ही आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना राहाता पोलीस ठाणे येथे हजर केले आहे. पुढील तपास राहाता पोलीस स्टेशन करीता आहे. 

ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर, पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली आहे.

COMMENTS