Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा.शरदचंद्र पवार साहेब यांची ’स्वाभिमान’ सभा यशस्वीतेसाठी सहकार्याबद्दल आभार- आ.संदीप क्षीरसागर

बीड प्रतिनिधी - खा.शरदचंद्र पवार साहेब यांची दि.17 ऑगस्ट रोजी झालेली ’स्वाभिमान’ सभा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणार्या सर्व घटकांचे आभार, आ.संद

अपघाताचे वाढते प्रमाण…
स्वप्न पडले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नाही : ना. अजित पवार
वाह ! क्या बात है , स्कीइंग १च नंबर | LokNews24

बीड प्रतिनिधी – खा.शरदचंद्र पवार साहेब यांची दि.17 ऑगस्ट रोजी झालेली ’स्वाभिमान’ सभा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणार्या सर्व घटकांचे आभार, आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केले आहेत.
बीड येथे दि.17 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा ’इंडिया’ आघाडीचे जेष्ठ नेते खा.शरदचंद्र पवार यांची सभा यशस्वीपणे पार पडली. ही सभा ऐतिहासिक आणि भव्यदिव्य होण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या स्वरूपात योगदान दिले. कार्यकर्ते, पदाधिकारी, साहेबप्रेमी नागरिक यांनी सभेच्या नियोजनासाठी प्रत्यक्ष काम केले त्याबद्दल त्या सर्वांचे आभार. प्रशासनाच्या वतीने उत्तम सहकार्य मिळाले. विशेषतः पोलीस प्रशासनाने अतिशय चोखपणे सुरक्षेसह इतर आवश्यक बाबींचे नियंत्रण व नियमन करण्यात विशेष सहकार्य केले त्याबद्दल पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर साहेब व सर्व पोलीस प्रशासन यांचे आभार. या कार्यक्रमास ज्यांच्यामुळे पूर्णत्व मिळाले ते सर्वच माध्यमे प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया व त्यांचे प्रतिनिधी यांचे आभार. सभेला उपस्थित राहीलेले पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला भगिनी, शेतकरी बंधू, सर्वसामान्य नागरिक तसेच या सभेच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अनमोल सहकार्य लाभलेल्या प्रत्येकाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आभार मानले आहेत.

COMMENTS